जळगाव, 30 नोव्हेंबर : विधानभा निवडणुकीत झालेला विजय हा ईव्हीएमचा विजय आहे. लोकांनी दिलेला कल नाही तर ईव्हीएमने दिलेला हा कल आहे आणि तो आम्हाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया मुक्ताईनगर मतदारसंघाच्या पराभूत उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहणी खडसे यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकासारखा प्रगत देश जर बॅलेट पेपरवर निवडणूका घेऊ शकते तर आपला ईव्हीएमसाठी एवढा अट्टहास का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला असल्याचेही रोहिणी खडसे म्हणाल्या. त्या आज माध्यामांसोबत बोलत होत्या.
महायुतीचा ईव्हीएममुळे विजय –
रोहिणी खडसे माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाल्या की, प्रत्येक मतदारसंघात आकड्यांमध्ये घोळ झाल्याचे दिसत आहे. महायुतीला जो विजय मिळालाय तो ईव्हीएममुळे विजय मिळालाय. आज अमेरिकासारख्या प्रगत राज्यांमध्ये की जिथे बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडते. तिथे ईव्हीएम मशीन वापरली जात नाही. पण आपल्या भारतात ईव्हीएम मशीन वापरण्याचा एवढा अट्टाहास का केला जातो, असा प्रश्न उपस्थित करत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी ते कशाला घाबरतात, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/shorts/QoqaiztvHSs?si=oVhK3utmnnib653Chttps://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
ईव्हीएममध्ये भ्रष्टाचार –
रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, जर तुम्ही काळबोरं केलं नाहीये तर तुम्हाला कशाची भिती वाटते. जर तुम्ही कुठलीही चुकीचे केले नाहीये आणि तुम्हाला लोकांवर विश्वास आहे आणि जनतेने दिलेला हा कौल आहे तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका होऊन जाऊ द्या, असे आव्हान रोहिणी खडसे यांनी दिले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल हा ईव्हीएममध्ये केलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार किंवा अफरातफर केली गेली असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.
16 व्हीव्हीपॅटची पुर्नमतमोजणी होण्यासाठी केला अर्ज –
रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, निकाल लागण्यापुर्वी मतदारसंघात समाजमाध्यमांवर एक यादी प्रसारित केली जात होता. माझ्या विरोधातील उमेदवाराला इतकी मत मिळणार, अशी खात्री त्या यादीतून दिली जात होती. त्या यादीतील मतदान आणि निकाल लागल्यानंतरचे त्या बूथवरील मतदान हे तंतोतंत कसे जुळतंय, याबाबत संशय निर्माण झाला आहे.
खरंतर, असा कोणताही ज्योतिषी जन्माला आलेला नाही की निकालाच्या दोन दिवस अगोदरच नेमक्या आकेडवारीसह कोणाला किती मते मिळणार असे सांगू शकेल. म्हणून ज्यापद्धतीने सोशल मीडियावर त्या यादीच्या माध्यमातून मतांची आकडेवारी दिसत होती, यावरून आम्हाला संशय आहे. आणि म्हणून मी माझ्या 16 व्हीव्हीपॅटची पुर्नमतमोजणी व्हावी, यासाठी अर्ज दाखल केला आहे. आणि यासाठीची सर्व प्रक्रिया पार पडली असून माझ्या मतदारसंघात ज्यापद्धतीचे निकाल लागला तो आधीपासून संशयास्पद असल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या.
माझा यावर विश्वास नाही –
माझ्या वडिलांच्या कारकिर्दीतही ज्या गावांमध्ये आम्हाला कमी मते मिळाली नाहीत. अशाही गावांमध्ये आम्हाला अगदी कमी मते मिळाली आहेत. खरंतर हे शक्यच नाहीये. लोक कुठलीही लाट आली किंवा कुठली योजना आली म्हणून बदलत नाहीत. लोकांचे एक भावनिक नाते आपल्याबरोबर जोडले गेले असते. ते नाते कोणीही एवढ्या लवकर तोडू शकत नाही. पण जे समोरच्यांकडून सांगितले जातंय की, लाडकी बहिण किंवा इतर गोष्टींमुळे आम्ही निवडून आल्याचा दावा केला जातोय. मात्र, माझा यावर विश्वास नसल्याचेही रोहिणी खडसे म्हणाल्या.
हेही वाचा : “एकनाथ शिंदे ज्यावेळी दरे गावी जातात तेव्हा….”, शिवसेनेतील मोठ्या नेत्याचे सूचक वक्तव्य –