• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार का?, एकनाथ शिंदेंनी वाढवला सस्पेन्स, काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 4, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Mahayuti's press conference after claiming to form government.

सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद.

मुंबई : भाजप विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत. तसेच अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी होतील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी पुन्हा एकदा सस्पेन्स वाढवला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे –

महायुतीमध्ये खातेवाटपावरुन नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा आहे. आज महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांना ते देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, संध्याकाळी आम्ही तुम्हाला याबाबत सांगतो. थोडं थांबा. देवेंद्रजी माझ्याकडे आले, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचाही जो आग्रह आहे, सर्वांना मी धन्यवाद देतो. सगळ्यांचा आदर करतो. त्यामुळे तुम्हाला सांगू.

महायुतीच्या नेत्यांनी केला सत्तास्थापनेचा दावा –

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता अखेर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या शपथ घेतील, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता राज्यात सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांकडून आजच देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. यानंतर महायुतीच्या सर्व नेत्यांनी आजच राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.

महायुतीच्या नेत्यांनी केला सत्तास्थापनेचा दावा

यावेळी भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे, अजित पवार, विनोद तावडे, प्रफुल्ल पटेल, यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या घेणार शपथ

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnaviseknath shindemahayuti government

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

August 2, 2026
Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page