पाचोरा, 2 फेब्रुवारी : कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार भाव मिळावा या मागणीसह विविध मागण्यांसाठी उद्या शुक्रवारी 3 फेब्रुवारीला एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ पाचोरा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे.
पाचोरा येथील तहसील कार्यालय येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात विविध शेतकरी हिताच्या मागण्या सरकारकडे केल्या जाणार आहेत.
कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार –
कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार भाव मिळावा,
सोयाबीन, तूर, सूर्यफूल पिकाला प्रतिक्विंटल 8 हजार रूपये भाव मिळावा
पंतप्रधान पिक विमा योजनेतून योग्य नुकसान भरपाई मिळावी
पाचोरा-भडगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अनुदान मिळावी
शेती पंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने आठ तास वीज पुरवठा मिळावा
शेती पंपाची मागील वीज बिलांची संपूर्ण माफी मिळावी
पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना लागू करण्यात यावी
शेतकऱ्यांचे शेती कर्ज देण्यासाठीची सिबिल स्कोर रद्द करण्यात यावा
सेबीच्या मार्फत शेतमालाची वायदे बाजारात केलेली बंदी ताबडतोब उठवावी
शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा तसेच प्रोत्साहन पर अनुदान पात्र शेतकऱ्यांना लवकर मिळावे त्यासाठी मागील सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी.
जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसानपोटी शासनाकडून भरीव नुकसानभरपाई मिळावी तसेच 100 टक्के अनुदानावर सौर कुंपण योजना अंमलात आणावी
फळबागांचे मागील वर्षाची अतिवृष्टी झालेली नुकसानाची भरपाई रक्कम ताबडतोब मिळावी
मुख्यमंत्री सौर योजना आणि पंतप्रधान कुसुम सोलर योजनेची व्याप्ती वाढवून मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मोफत सोलर पंप योजनेचा लाभ द्यावा
रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी पिकासाठी मिळणारी रक्कम 3 वर्ष ऐवजी 2 वर्ष करावी या मांगण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना (ठाकरे गट), युवासेना आणि शेतकरी सेनेतर्फे करण्यात आले आहे.