पुणे – विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक असे यश मिळाले. तर महाविकास आघाडीचा दारुण असा पराभव झाला. त्यामुळे ईव्हीएम मशीन विरोधात महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतची माहिती दिली. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
पत्रकार परिषदेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकांची मागणी आहे. त्या मागणीचा आदर करून आम्ही ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तसेच बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, ही आमची मागणी आहे. ईव्हीएमबाबतचे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत. तसेच ईव्हीएम विरोधात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
- बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, ही आमची मागणी.
- ईव्हीएमबाबतचे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत.
- पेपर लिक झाल्यावर परिक्षा रद्द होतात.
- एखाद्या गोष्टीबाबत संभ्रम असेल तर जगात झालेला बदल आपणही करावा, ही आमची मागणी.
- एकदा बॅलेटपेपर निवडणुका झाल्या तर कोणतीच समस्या राहणार नाही.
- जगात हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय अडचण.
- आपण पाश्चिमात्य जग, एआय वैगेरे यावर इतकं काम जगाबरोबर करतो आहे, तर यावरही करावं. अडचण काय.
- 2019 मध्ये जेव्हा केंद्रात आमच्याकडे संख्याबळ नव्हते तेव्हा विरोधी पक्षनेता नव्हता.
- पण 1980 मध्ये नंबर कमी होते काँग्रेस पक्षाने दिलदारपणा दाखवून महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता दिला होता.
- 2014 आधीचा भाजप हा पटकन कामाला लागून लवकर सरकार स्थापन करणारा होता. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं, निकाल लागून दोन आठवडे झाले तरी मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ, मंत्रिमंडळ विस्ताराला इतका वेळ लागतोय, यामागे काय कारण आहे, माहिती नाही.
- दिल्लीतील तीन चार विषयांवर चर्चा सुरू आहे. सरकार स्थापनेला इतका उशीर होत आहे, हे दुर्दैव आहे.
- ईव्हीएम विरोधात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाणार.