• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला ओडिशात अपघात, जिल्हा प्रशासनाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 5, 2023
in जळगाव जिल्हा, देश-विदेश
जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला ओडिशात अपघात, जिल्हा प्रशासनाची माहिती

प्रतिकात्मक फोटो

जळगाव, 5 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातून दोन धाम यात्रेला भाविकांना घेवून गेलेली ट्रॅव्हल बस क्रमांक (GJ05Bx3438)चा अपघात झाला. ओडिसा राज्याच्या सीमेजवळील सोहला गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभी असताना या ट्रॅव्हल्सला बसला सिमेंटच्या गोण्या भरलेल्या ट्रकने मागून धडक दिली. शनिवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला. या अपघातातील जळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुदैवाने सुखरूप आहेत.

जळगाव येथून गुजरातमध्ये नोंदणी असलेल्या गंगोत्री ट्रॅव्हल्सद्वारा आसाम, नेपाळ, गंगासागर जगन्नाथ पुरी, उज्जैन, वाराणसी, कामाख्या देवी या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी जळगाव येथून एकूण 49 भाविक गेले आहेत. या भाविकांमध्ये नेपानगर येथील 7, औरंगाबाद 4, पुणे 2, मुंबई 2, सोलापूर 2 आणि जळगाव जिल्ह्यातील 31 प्रवासी होते. यापैकी जिल्ह्यातील सर्व यात्रेकरी सुखरूप असून श्रीमती मंगलाबाई पाटील, बळीराम पेठ, जळगाव यांना किरकोळ दुखापत झालेली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी, जळगाव यांना सदर घटनेबाबत माहिती देऊन अपघातग्रस्त नागरिकांना मदत कार्य करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी, जळगाव यांनी त्वरीत संबलपुर जिल्हाधिकारी आणि बारलगढ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि सर्व अपघाग्रस्तांना मदत कार्य करण्याबाबत सूचित केले. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने सर्व अपघातग्रस्त नागरिकांना स्थानिक शासकीय रुग्णालयात हलवले व किरकोळ जखमी असलेल्यांवर उपचार केले आहेत.

यात्रेच्या आयोजक शोभा पाटील (राहणार जळगाव) या जिल्हा प्रशानाच्या सूचनेनुसार रात्रीच संबलपूर येथे रवाना झाल्या आहेत. तसेच सर्व यात्रेकरूंना संबलपूर प्रशासनाच्या मदतीने जळगाव येथे सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क –

जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 0257-2217193/2223180 अथवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मोबईल क्रमांक 9373789064 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. हीबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gangotri travels accident odishagangotri travels gujratjalgaon touristsjalgaon tourists accidentjalgaon tourists accident in odisha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

September 6, 2026
दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page