• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 24, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

मुंबई, 24 ऑक्टोबर: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी माननीय राजेंद्र गौतम पाल यांच्या अध्यक्ष तेखाली मुंबई येथील टिळक भवन येथे नकुतीच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांच्यासोबत संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करणे, अनुसूचित जाती विभागाचा जनसंपर्क वाढविणे आणि समाजातील विविध घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, प्रदेश उपाध्यक्ष रमेश पवार, प्रदेश सरचिटणीस राज वाल्मिकी, सरचिटणीस राहुल मोरे, वंदना गजरे,प्रदेश सचिव प्रीतमकुमार गोवर्धन तसेच जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष ॲड. कैलास शेळके उपस्थित होते.

बैठकीदरम्यान जळगाव जिल्ह्यात अनुसूचित जाती विभागाच्या संघटनात्मक विस्तारासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबवून जिल्ह्यातील प्रत्येक गावात काँग्रेस संघटनेचा संपर्क वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच संविधानातील मूल्ये, समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि लोकशाही अधिकारांविषयी जनजागृती करण्यासाठी ‘संविधान जागृती रॅली’ आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करून अनुसूचित जाती विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यावर चर्चा झाली.

वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचून जनतेच्या समस्या जाणून घेणार –

जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जाती समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प या बैठकीत व्यक्त करण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधा, शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील अडचणी जाणून घेऊन त्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात येणार आहे.

केवळ बैठका आणि कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता तळागाळातील नागरिकांशी थेट संवाद साधणे, कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे आणि समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांना संघटनात्मक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या आगामी उपक्रमांचा प्रमुख उद्देश राहणार आहे.

जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एकत्रित काम करणार –

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती विभाग समन्वयाने काम करणार असल्याचे ॲड. अंकुश कटारे यांनी सांगितले. जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधून संघटनात्मक कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि गावपातळीवर पक्षाचा जनसंपर्क वाढविणे यासाठी अनुसूचित जाती विभाग सक्रिय भूमिका बजावणार आहे.

राष्ट्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला गती देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आगामी काळात गावोगावी शाखा विस्तार, संविधान जागृती, जिल्हास्तरीय मेळावा आणि जनसंपर्क अभियानांच्या माध्यमातून जिल्ह्यातील काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागाच्या आगामी वाटचालीसाठी ही आढावा बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून, तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करणे, हे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

हेही वाचा: दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

बातमी शेअर करा !
Share
Tags: congress partymarathi newsscheduled castes departmentsuvarna khandesh livetilak bhawan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

October 24, 2026
 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

October 24, 2026
नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

October 24, 2026
VIDEO | महाराष्ट्रातील 282 माजी अग्निवीरांना पोलीस दलात नियुक्ती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

VIDEO | महाराष्ट्रातील 282 माजी अग्निवीरांना पोलीस दलात नियुक्ती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

October 24, 2026
‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

October 23, 2026
एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

October 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page