• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळ्यातील एन. इ. एस. गर्ल्स हायस्कूलचा स्नेहसंमेलनाचा उपक्रम; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 3, 2025
in पारोळा, ताज्या बातम्या
पारोळ्यातील एन. इ. एस. गर्ल्स हायस्कूलचा स्नेहसंमेलनाचा उपक्रम; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुनिल माळी, शहर प्रतिनिधी

पारोळा, 3 जानेवारी : पारोळा तालुक्यातील एकमेव एन. इ. एस. गर्ल्स हायस्कूल येथे मुलींच्या नृत्य सादरीकरणातून कलाविष्काराचा स्नेहसंमेलन कार्यक्रम 2 जानेवारी गुरुवार रोजी संपन्न झाला. मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कला सादरीकरणाचा कार्यक्रम दरवर्षी विद्यालयात आयोजित केला जातो. या स्नेहसंमेलनातून आदर्श संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यास मदत होऊन मुलींच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. शैक्षणिक विकासाबरोबर सांस्कृतिक विकास साधला जातो.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपुजन व सावित्रीबाई फूले यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी शाळेत वर्षभरात चालणारे विविध उपक्रमांचे कौतूक केले. कार्यक्रमात 5 वी ते 10 वीच्या 197 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. यात पोवाडा, रिमिक्स, लावणी नृत्य सर्वधर्म समभाव, व्यसनमुक्ती, नाटीका, मराठी, हिंदी, अहिराणी भाषेतील गाण्यांच्या चालींवर नृत्य, प्रादेशिक नृत्य प्रकारांचा कलाविष्कार, पथनाट्य असे विविध प्रकारातून भारतीय संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडविले. यावेळी विद्यार्थिनींनी उपस्थितांची मने जिंकून, प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुलींचे कौतुक केले जात होते.

यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मिलिंद मिसर हे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष केशव क्षत्रीय, संचालक रोहन मोरे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक चंद्रकांत चौधरी, मुख्याध्यापिका नंदिनी मोराणकर, बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक शरद अहिरे, पर्यवेक्षक डि. जी. शिनकर, केंद्र प्रमुख संजय पाटील, पत्रकार राकेश शिंदे, योगेश पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला शिक्षिका सरला अमृतकार, सुनिता देसाई, योजना देशमुख, प्रतिभा भोई, सरिता पाटील, रुपाली कोठावदे, स्मृती देशमुख, दर्शना शाह उज्वला मोरे, वैशाली मोरे, सोनाली भामरे यांनी केले तर आभार जाकिर शेख यांनी मानले. यावेळी स्नेहसंमेलन प्रमुख जाकिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर खैरनार, दगडू पवार, सचिन पाटील, धर्मेंद्र शिरोळे, रविंद्र ठाकरे, सुनिल झडप, तिरुमल डूडवे, राजेंद्र पाटील, चंद्रशेखर निकम, संकेत मोरे, संकेत कोळपकर, दिपक पाटील, जयेश भदाणे, प्रशांत पांडे ,भूषण शिरसाठ, कपिल माने अविनाश पाटील, योगेश शेलार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा : Chopda News : बेकायदेशीर विनापरवाना एक गावठी पिस्तूलसह 2 जिवंत काडतूस आढळले, चोपड्यातून एकाला अटक

बातमी शेअर करा !
Share
Tags: annual get togethermarathi newsn e s girls high schooln e s girls high school parolaparola latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार किशोर आप्पा पाटील आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर शिवसेनेकडून पक्षसंघटनेसाठी मोठी जबाबदारी

आमदार किशोर आप्पा पाटील आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर शिवसेनेकडून पक्षसंघटनेसाठी मोठी जबाबदारी

March 31, 2026
एप्रिल 2026 मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन – कृषिमंत्री दतात्रय भरणे

एप्रिल 2026 मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन – कृषिमंत्री दतात्रय भरणे

March 31, 2026
दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणीसाठी दिव्यांग मंडळ आता सोमवार ते शुक्रवार कार्यरत राहणार

दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणीसाठी दिव्यांग मंडळ आता सोमवार ते शुक्रवार कार्यरत राहणार

March 30, 2026
सातगाव डोंगरी येथे आयोजित श्रीमद् भागवत कथेची सांगता; राजरवाल परिवाराच्या वतीने पाच वर्षांपासून आयोजन

सातगाव डोंगरी येथे आयोजित श्रीमद् भागवत कथेची सांगता; राजरवाल परिवाराच्या वतीने पाच वर्षांपासून आयोजन

March 30, 2026
वीर जवान तुझे सलाम! शहीद जवान बापू कोळी यांना अखेरचा निरोप; लोहारीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वीर जवान तुझे सलाम! शहीद जवान बापू कोळी यांना अखेरचा निरोप; लोहारीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

March 30, 2026
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम; मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोहन घुगेंचा गौरव

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम; मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोहन घुगेंचा गौरव

March 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page