मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा – चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या.
चंद्रकांत सोनवणे यांनी कोणत्या दोन मागण्या केल्या –
ल. पा. प्रकल्प हंड्याकुंड्यास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी ईपीसी बैठक घेण्याची विनंती आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. या विनंतीवर अजितदादांनी पुढील बैठकीत विषय मागीऀ लावु, असे आमदार सोनवणेंना आश्वासित केले.
तसेच क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमदार स्थानिक विकासनिधी देण्यावर जाचक अटी असलेला जी. आर. त्वरित बदलण्यात यावा, असे निवेदनही यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. यावर अजित पवार यांनी संबधित अधिकाऱ्यांना बदल करण्याचे आदेश दिले.
VIDEO : Mla Chandrakant Sonawane : नागपूर हिवाळी अधिवेशनातून चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणेंशी विशेष संवाद