• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रवींद्र चव्हाणांना भाजपकडून मोठी जबाबदारी, आता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, अशी आहे त्यांची कारकिर्द

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 12, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Ravindra Chavan became Bjp Maharashtra state executive president

शिर्डी महाअधिवेशनात रवींद्र चव्हाणांचा सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आदी मान्यवर.

शिर्डी – भाजपचे ज्येष्ठ आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्ड यांनी ही नियुक्ती केली. तसेच भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर आता भाजपमध्ये संघटनेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण हे याआधी सार्वजनिक बांधकाममंत्री राहिले आहे. मात्र, यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. दरम्यान, आता त्यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिर्डी महाअधिवेशनात सत्कार –

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी आज माझ्यावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. तर पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देतो. सर्वांनी मला कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. माझा हा सन्मान आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा हा पक्ष आहे. जबाबदारीचे ओझं खांद्यावर आल्यावर दडपण येते, अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली.

तर कालपासून शिर्डी येथे भाजपा महाअधिवेशनाची सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संघटनात्मक बैठकीत रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आलेल्या नवीन जबाबदारीबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. याप्रसंगी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.

अशी आहे रविंद्र चव्हाण यांची राजकीय कारकिर्द –

  • 2007 मध्ये रविंद्र चव्हाण हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच 2007 मध्येच काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले.
  • 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.
  • 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली.
  • 2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. तसेच कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते.
  • 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. 2021 मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
  • 2021 मध्ये रविंद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यांनी पालघर आणि सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला.
  • 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघरची जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
  • 2024 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकत चौथ्यांदा आमदार बनले.
  • यानंतर डिसेंबर 2024 मध्ये भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारीपदी निवड

Video : “लाच ती ‘लाच’च असते!”, जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांनी सरकारी कर्माचाऱ्यांना सुनावलं, पाहा व्हिडिओ

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpbjp mlachandrashekhar bawankuledevendra fadnavismlaravindra chavanshirdi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

November 30, 2025
अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

November 30, 2025
पाल गार्डन व सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पाल गार्डन व सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

November 29, 2025
नगरपरिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी; राज्य सरकारचा आदेश जारी

नगरपरिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी; राज्य सरकारचा आदेश जारी

November 29, 2025
गोव्याच्या परतगलै मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 77 फूट श्रीराम मूर्तीचे अनावरण

गोव्याच्या परतगलै मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 77 फूट श्रीराम मूर्तीचे अनावरण

November 29, 2025
जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

November 28, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page