मुंबई, 18 जानेवारी : बांग्लादेश सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. बांग्लादेश सरकारने कांदा आयातीवर दहा टक्के आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कांदा आयातीवर दहा टक्के आयातशुल्क –
भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सर्वाधिक कांदा निर्यात ही बांगलादेशमध्ये होत असते. अशातच बांग्लादेश सरकारने कांदा आयातीवर दहा टक्के आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आयातशुल्काचा बसणार फटका –
बांगलादेशने भारतातून आयात होणाऱ्या कांद्यावर 10 टक्के आयात शुल्क आकारणीला सुरुवात केली असल्याने निर्यात शुल्क वाढले आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावर परिणार झाला असून. उत्पादक शेतकऱ्यासह कांदा निर्यातदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरम्यान, बांग्लादेशने लावलेल्या आयात शुल्काचा सर्वाधिक फटका हा नाशिक जिल्ह्याला बसणार आहे.
केंद्राकडून दिलासा मिळणार का?
देशात कांद्याची दरवाढ झाली की नियंत्रण आणून केंद्र सरकारद्वारे कांद्याच्या भावाला नियंत्रित केले जाते. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, बांगलादेशसह अनेक देशांमध्ये आयात शुल्क वाढवून कांद्याच्या कृषी मालावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात असतो. दरम्यान, आधीच देशात कांद्यावर 20 टक्के निर्यातशुल्क असल्याने कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त असल्याने आता केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा : ‘…अन् पोलिसांनी अत्यंविधी थांबवला; बापाने 9 वर्षीय मुलाची हत्या केल्याचे झाले उघड, बारामतीत नेमकं काय घडलं?