ईसा तडवी, प्रतिनिधी
भडगाव, 25 जानेवारी : भडगाव तालुका औषध विक्रेता संघटनेच्या माध्यमातून आयोजित भव्य रक्तदान शिबीर शिवसेना कार्यालय भडगाव येथे शुक्रवार 24 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे तिसऱ्यांदा निवडून आल्याने भडगाव तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.
आमदार किशोर पाटील यांचा सत्कार –
माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भडगाव तालुका औषध विक्रेता संघटनेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या रक्तदान शिबिरात किशोर आप्पा पाटील यांची पाचोरा-भडगाव मतदारसंघात तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने आमदार आमदार पदी निवड झाल्याबद्दल भडगाव तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भंडारी, महेश पाटील, संजय पाटील, जगदीश सोनावणे, राहुल ओसवाल, तसेच शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा भडगाव शेतकी संघ अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, माजी नगरसेवक जगु दादा, माजी नगरसेवक संतोष भाऊ महाजन, शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी, शिवसेना शहरप्रमुख बबलू देवरे, शिवसेना महेंद्र ततार, शिवसेना योगेश गंजे, तसेच माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र टीम उपस्थित होती.