ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 26 जानेवारी : पाचोरा शहरातील पोलीस कवायत मैदानावर देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचोरा उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या हस्ते आज सकाळी मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह पोलीस उपधीक्षक धनंजय येरूळे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, तहसिलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, आदी उपस्थित होते.
प्रजासत्ताकदिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असतो. दरम्यान, यावेळी पाचोरा शहरातील राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांसह पोलीस कर्मचारी, होमगार्डस् तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताकदिनानिमित्त देशभरात उत्साह –
प्रजासत्ताक दिनाला संपुर्ण देशभर मोठा उत्साह असतो. राष्ट्रीय ध्वज उभारण्यापासून ते शाळा आणि समुदायांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक भारतीय हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात. लोक स्थानिक उद्यानांमध्ये जमतात तसेच देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करतात आणि परेडचे थेट प्रक्षेपण पाहतात. प्रजासत्ताकदिनी सर्वत्र देशभक्तीपवर गीते लावली जातात.
हेही वाचा : VIDEO : अमळनेरच्या तरुणीने केलं पंतप्रधान मोदीचं कौतुक; दिल्लीत नेमकं काय म्हणाली?