नवी दिल्ली, 27 जानेवारी : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून 6 हजार रूपये मिळतात. आतापर्यंत या योजनचे 18 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असताना 19 वा हप्ता कधी जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा लागली आहे. असे असताना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारीला जमा होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.
केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली माहिती –
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणारी योजनांपैकी एक आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत आत्तापर्यंत 9 कोटी 25 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.
काय आहे पीएम किसान योजना? –
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभधारक शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये दिले जातात. यामध्ये एका वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती आणि अद्याप ही योजना सुरु आहे. तसेच आता एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय हा पीएम किसान योजनेसंदर्भात घेत शेतकऱ्यांना 18 वा हप्ता मंजूर करण्यात आला. यानंतर आता वाशिममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 व्या हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे.
हेही वाचा : “तुम्हाला डोकं असतं तर…” मंत्री गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल