ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 28 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथे ब्रह्मलीन सद्गुरु गंगा बाबांच्या कृपाशीर्वादाने व स्वामी चिदानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने गेल्या 38 वर्षापासून अखंड हरिनाम किर्तन सप्ताह परंपरा चालू आहे. दरम्यान, वडगाव कडे येथे 20 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह उत्साहात संपन्न झाला.
वडगाव कडे येथे आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे गावामध्ये आध्यात्मिक व चैतन्यमय वातावरण तयार होते. सकाळी काकडा, दुपारी श्री रामायण कथा व सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री नऊ ते अकरा मध्ये कीर्तन सेवा पार पडली. तसेच गावातील मंडळींनी दररोज मारुती मंदिरावरती प्रहर सेवा रुजू केली.
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी कानळदा येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज आवाकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कीर्तनकार, मृदंगाचार्य, टाळकरी, गायनाचार्य, व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्यावतीने सर्वांना स्वामींचे प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
सात दिवसांत या किर्तनकार महाराजांची झाली किर्तन –
- ह.भ.प. प्रभुदास महाराज कदम, आमठाणा जि. छत्रपती संभाजीनगर
- ह.भ.प. सुरेश महाराज आढाव, चिंचखेड ता. कन्नड
- ह.भ.प. संभाजी महाराज, धुळे
- ह.भ.प. भावेश महाराज विटनेर, ता. पारोळा
- ह.भ.प. कैलास महाराज निंबाळकर, आळंदी (घोसला)
- ह.भ.प. नरेंद्र महाराज माळी, कोल्हे ता. पाचोरा
- ह.भ.प. पांडुरंग महाराज आवारकर कानळदा