• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँक निवडणूक अपडेट! महायुतीच्या पाच जागा बिनविरोध; ‘या’ जागांवर तिढा अद्याप कायम; अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 17, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्हा बँक निवडणूक अपडेट! महायुतीच्या पाच जागा बिनविरोध; ‘या’ जागांवर तिढा अद्याप कायम; अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस

जळगाव, 17 ऑक्टोबर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बँकेच्या २१ जागांसाठी ४०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चित करण्यासाठी महायुतीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, जवळपास सर्व जागांवर एकमत झाले असले तरी मुक्ताईनगर, चोपडा आणि बोदवड येथील जागांसह महाविकास आघाडीला द्यावयाच्या एका जागेचा तिढा अद्याप कायम आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत पाच जागा बिनविरोध –

शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांच्या आई नलिनी पाटील आणि पत्नी मृणाल पाटील यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबरोबर भाजपकडून भुसावळ मतदारसंघातून मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत पाच जागांवरील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जागावाटपासंदर्भात बैठकांचे सत्र सुरूच –

जागावाटपाच्या प्रश्नावर जळगाव येथील शासकीय अजिंठा विश्रामगृहात महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक झाली. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्यात जवळपास पाच तास चर्चा झाली. महायुतीमध्ये २१ पैकी १८ जागांबाबत एकमत झाल्याचे सांगितले जात असले तरी तीन जागांवरील निर्णय अद्याप झालेला नाही. याशिवाय महाविकास आघाडीला द्यावयाच्या एका जागेबाबतही चर्चा सुरू आहे. महायुतीकडून महाविकास आघाडीला एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, कोणत्या पक्षाने ही जागा लढवायची, याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घ्यावा, असे सूचित करण्यात आले आहे.

पाचोऱ्यातून सुमित पाटील यांची निवड बिनविरोध? –

पाचोरा मतदारसंघातून आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज यापूर्वी अवैध ठरविण्यात आला होता. त्यांनी नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर त्यांच्या अर्जाला वैधता मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे ही पाचोऱ्याची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली असल्याचे सांगितले जात असताना ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महायुतीमध्ये जागावाटपासाठी आतापर्यंत चार बैठका झाल्या असून, अंतिम निर्णयासाठी प्रयत्न सुरू आहेत. १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी आणखी आठ ते दहा जागा बिनविरोध होण्याची शक्यता मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या दिवशी किती उमेदवार निवडणुकीतून माघार घेतात आणि प्रत्यक्ष किती जागांसाठी मतदान होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व 2026’ सोहळा दिमाखात संपन्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district bank elections 2026jdcc bank elections 2026marathi newsnominations withdrawalseat-sharingsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँक निवडणूक अपडेट! महायुतीच्या पाच जागा बिनविरोध; ‘या’ जागांवर तिढा अद्याप कायम; अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणूक अपडेट! महायुतीच्या पाच जागा बिनविरोध; ‘या’ जागांवर तिढा अद्याप कायम; अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस

November 17, 2026
आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व 2026’ सोहळा दिमाखात संपन्न

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व 2026’ सोहळा दिमाखात संपन्न

November 17, 2026
शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

November 16, 2026
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

November 15, 2026
कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा; मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा; मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

November 15, 2026
आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

November 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page