अक्कलकुवा (नंदुरबार), 25 फेब्रुवारी : सातपुड्यातील होळी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. पारंपारिक पद्धतीने हा होळी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. येत्या 2 मार्चपासून सातपुड्यातील या होळी उत्सवाला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील सातपुड्यातील पारंपारिक होळी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या उत्सवामध्ये सातपुडावासी सहभागी होणार आहेत. होळीच्या गीतांनी तसेच या गीताला साथ देणाऱ्या ढोल ताशांच्या आवाज सातपुड्यात घुमणार आहे. या उत्सवामध्ये सातपुड्यातील आदिवासी बांधव होळीगीते गातात. त्यामुळे रात्रभर गीतांचे स्वर आणि ढोल ताशांचा सुरू असतो. त्यामुळे रात्री या गीतांमुळे चैतन्य निर्माण होते.
यावर्षी सातपुड्यातील या होळी उत्सवाला 2 मार्चपासून सुरुवात होत आहे. तर 2 मार्चपासून 10 मार्चपर्यंत हा होळीउत्सव चालणार आहे. 2 मार्चला मानाची होळी मोरीराही येथील होळी पेटवून या उत्सवाला सुरुवात होणार आहे.
असा असेल होळी उत्सवाचा कार्यक्रम –
2 मार्चला मानाची होळी मोरीराही येथील होळी पेटवून उत्सवाला सुरुवात
त्याचदिवशी पिपंलाबारी येथील होळीही होईल.
3 मार्चला तोडीकुंड, पाडली, काकरपाटी, अस्तंबा,
4 मार्चला मेवडी, पाडली, (लहान) रामसाला, गोवऱ्या,
5 मार्चला कालीबेल, उर्मिलामाळ, अस्तंबा,
6 मार्चला काठीची (राजवाडी) होळी, गादवाणी, सुरवाणी
7 मार्चला मोलगी, तलाई, खर्डा,
8 मार्चला असली, जामली,
9 मार्चला जमाना, वरखेडी, धनाजे,
10 मार्चला शेवटची होळी म्हणजे बुगवाडा होळी आणि उत्सवाचा समारोप
अशाप्रकारे दररोज वेगवेगळ्या गावात होळी उत्सव साजरा केला जाणार आहे. बुगवाडा येथील होळी साजरा करुन सातपुड्यातील या होळी उत्सवाचा समारोप होईल.