• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार, भारतात येण्याचेही दिले निमंत्रण, काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 14, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Prime Minister Narendra Modi thanked Donald Trump, invited him to come to India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार, भारतात येण्याचेही दिले निमंत्रण, काय म्हणाले?

वाशिंग्टन (अमेरिका), 14 फेब्रवारी : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तुमच्या मैत्री आणि भारताप्रती असलेल्या अतूट बांधिलकीबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुमची 2020 मधील भारत भेट अजूनही भारतीय जनतेच्या स्मरणात आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा एकदा त्यांना भेटतील अशी त्यांना आशा आहे. 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने, मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-अमेरिका संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान निवेदन दिले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, दोन्ही देशांचे प्रतिनिधी आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थिती होते.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी –

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र अध्यक्ष ट्रम्प यांचे माझे शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार मानतो. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे, भारत-अमेरिका संबंध जपले आहेत आणि पुनरुज्जीवित केले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ज्या उत्साहाने आम्ही एकत्र काम केले होते; तोच उत्साह, तीच ऊर्जा आणि तीच वचनबद्धता मला आज जाणवली.

आजच्या आमच्या चर्चेत त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील आमच्या कामगिरीबाबत समाधान आणि परस्परांप्रती विश्वासाचा सेतू होता. तसेच नवीन उद्दिष्टे साध्य करण्याचा संकल्प देखील होता. भारत आणि अमेरिकेची साथ आणि सहकार्य एक उत्तम जग घडवू शकते असा आम्हाला विश्वास वाटतो.

अमेरिकेतील लोक अध्यक्ष ट्रम्प यांच्या “मेक अमेरिका ग्रेट अगेन” म्हणजेच “मागा” या ब्रीदवाक्याशी परिचित आहेत. भारतातील लोक देखील वारसा आणि विकासाच्या मार्गावर “विकसित भारत 2047″चा संकल्प घेऊन जलद गतीने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

मी जर अमेरिकेच्या भाषेत म्हटले तर विकसित भारत म्हणजे ‘मेक इंडिया ग्रेट अगेन ‘ म्हणजेच “मिगा “. जेव्हा अमेरिका आणि भारत एकत्र काम करतात, म्हणजेच “मागा ” आणि “मिगा ” एकत्र येतात, तेव्हा समृद्धीसाठी “मेगा (MEGA)” भागीदारी तयार होते. आणि हीच मेगा (प्रचंड) भावना आपल्या उद्दिष्टांना नवीन व्याप्ती आणि वाव देते.

आज, आम्ही द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुपटीने अधिक वाढवून 500 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आमच्या टीम्स परस्पर हितावह व्यापार करार लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने काम करतील. भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तेल आणि वायू व्यापार अधिक मजबूत करू. ऊर्जा विषयक पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक देखील वाढेल. अणुऊर्जा क्षेत्रात, आम्ही छोट्या मॉड्यूलर रिऍक्टर्सच्या दिशेने सहकार्य वाढवण्याबद्दल देखील चर्चा केली.

भारताच्या संरक्षण सज्जतेत अमेरिकेची महत्त्वाची भूमिका आहे. धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून, आम्ही संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण या दिशेने सक्रियपणे पुढे जात आहोत. आगामी काळात, नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे आमची क्षमता वाढवतील. आम्ही ऑटोनॉमस सिस्टम्स इंडस्ट्री अलायन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दशकासाठी संरक्षण सहकार्य आराखडा तयार केला जाईल. संरक्षण आंतर-परिचालन क्षमता, लॉजिस्टिक्स, दुरुस्ती आणि देखभाल हे देखील त्याचे मुख्य घटक असतील, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाधारित शतक आहे. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या देशांमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील घनिष्ट सहकार्य संपूर्ण मानवजातीला नवीन दिशा, बळकटी आणि संधी देऊ शकते. भारत आणि अमेरिका कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम, जैवतंत्रज्ञान आणि अन्य तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्र काम करतील.

आज आपण ट्रस्ट (टीआरयूएसटी) वर, म्हणजेच धोरणात्मक तंत्रज्ञानाचा अवलंब करून संबंधांमध्ये परिवर्तन घडवण्यावर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत, महत्वाची खनिजे, प्रगत सामग्री आणि औषधांच्या मजबूत पुरवठा साखळ्या तयार करण्यावर भर दिला जाईल. लिथियम आणि पृथ्वीवरील दुर्मिळ सामरिक खनिजांची पुनर्प्राप्ती आणि प्रक्रिया उपक्रम सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. अंतराळ क्षेत्रात आमचे अमेरिकेसोबत गाढे सहकार्य आहे. “इस्रो” आणि “नासा” यांच्या सहकार्याने तयार केलेला “निसार” उपग्रह लवकरच भारतीय प्रक्षेपण वाहनाद्वारे अंतराळात प्रक्षेपित केला जाईल.

भारत आणि अमेरिकेतील भागीदारी लोकशाही आणि लोकशाही मूल्ये आणि व्यवस्थांना आधार देते. हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. यामध्ये क्वाड महत्वाची भूमिका बजावेल. या वर्षी भारतात होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेत, आम्ही नवीन क्षेत्रांमध्ये भागीदार देशांसोबत सहकार्य वाढवू. “आयएमईसी” आणि “आय2यु2” उपक्रमांतर्गत, आम्ही आर्थिक कॉरिडॉर आणि कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधांवर सोबत काम करू.

दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारत आणि अमेरिकेची परस्परांना खंबीर साथ आहे. सीमापार दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी एकत्रित कृती आवश्यक आहे यावर आम्ही सहमत आहोत. 2008 मध्ये भारतात नरसंहार करण्याऱ्या अपराध्याला आता भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानतो. भारतीय न्यायालये आता योग्य ती कारवाई करतील, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

अमेरिकेतील भारतीय समुदाय हा उभय देशांच्या संबंधातील एक महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी, आम्ही लवकरच लॉस एंजेलिस आणि बोस्टनमध्ये नवीन भारतीय वाणिज्य दूतावास उघडणार आहोत. आम्ही अमेरिकन विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना भारतात त्यांचे ऑफ शोअर कॅम्पस उघडण्यासाठी आमंत्रित केले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तुमच्या मैत्री आणि भारताप्रती असलेल्या अतूट बांधिलकीबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुमची 2020 मधील भारत भेट अजूनही भारतीय जनतेच्या स्मरणात आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा एकदा त्यांना भेटतील अशी त्यांना आशा आहे. 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने, मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: donald trumpnarendra modipm modipm modi usa visit

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या 20 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या 20 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

June 19, 2025
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन; वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज अंत्यसंस्कार

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन; वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज अंत्यसंस्कार

June 19, 2025
Video | एरंडोल खून प्रकरण | ‘धक्का लागला म्हणून हत्या’; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी नेमकं काय म्हणाले?

Video | एरंडोल खून प्रकरण | ‘धक्का लागला म्हणून हत्या’; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी नेमकं काय म्हणाले?

June 19, 2025
सध्या बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट बंद; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले ‘हे’ आवाहन 

सध्या बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट बंद; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले ‘हे’ आवाहन 

June 18, 2025
Rain Update : गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

Rain Update : गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

June 18, 2025
Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

June 18, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page