• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नवोदय विद्यालय येथे 2 दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न, ‘वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय शास्त्रा’वर विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 19, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
नवोदय विद्यालय येथे 2 दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न, ‘वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय शास्त्रा’वर विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद

नांदेड, 19 फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील शंकर नगरमध्ये असलेल्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात 17 व 18 फेब्रुवारी 2025 रोजी “वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय शास्त्र” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. SEER भारत फाऊंडेशन आणि शरदचंद्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेड यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. 8वी, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषरित्या आयोजित या उपक्रमामध्ये पुष्पबंधांचे विविध प्रकार प्रत्यक्ष दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना परिसरात थेट निरीक्षण करून पर्यावरणविज्ञान व वनस्पतीशास्त्र याबद्दल सखोल ज्ञान मिळावे, यासाठी शालेय आवारात क्षेत्रभ्रमणही करण्यात आले.

या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सचिन के. तिप्पट (प्राध्यापक व विभाग प्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, नरसम्मा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, किरण नगर, अमरावती), डॉ.एस.एस.पाटील (विभागप्रमुख वनस्पतीशास्त्र) आणि सहाय्यक प्राध्यापक दर्शन तळहांडे (वनस्पतीशास्त्र विभाग, शरदचंद्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय) यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना वनस्पती वर्गीकरण आणि पर्यावरणविषयक संकल्पना अधिक स्पष्टपणे समजल्या.

SEER भारत फाऊंडेशनने विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक साहित्य आणि कीटचे वितरण केले. त्यांच्या वतीने अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि पर्यावरणीय भान वाढवण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमास शरदचंद्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा मोठा पाठिंबा मिळाला, ज्यामध्ये प्राचार्य डॉ. के. हरिबाबू आणि उपप्राचार्य व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एस. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनामागे जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेडचे प्राचार्य श्री. एस. जी. मांडले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, श्री. एन. एन. घमे (PGT जीवशास्त्र) आणि श्री. मोहित (PGT गणित) यांचेही सहकार्य लाभले. श्री. एन. एन. घमे सर अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या आयोजनासाठी सतत आग्रही असतात आणि ते स्वतः जीवशास्त्राचे शिक्षक असल्याने हा कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यातून त्यांची पर्यावरण आणि आपल्या आसपासच्या वनस्पतींबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना राबवली.

SEER भारत फाऊंडेशनचे सचिव शुभम धर्माळे तसेच प्राचार्य के. हरीबाबू म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) विषयांबद्दलची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही भविष्यात अधिकाधिक अशा उपक्रमांचे आयोजन करत राहू.”

ही कार्यशाळा अत्यंत प्रेरणादायी ठरली, विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला आणि वैज्ञानिक शिक्षण व पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवांचे सादरीकरण केले आणि त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात कसा करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली, ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले.

यासारख्या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि त्यांची पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढते. अधिकाधिक विद्यार्थी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करू शकतील आणि पर्यावरण रक्षणासाठी योगदान देऊ शकतील, यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प आयोजकांनी केला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: environmentnanded newsnavodaya vidyalaya

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page