• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे निर्देश, नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 27, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Deputy Chief Minister Eknath Shindes important instructions regarding the Har Ghar Jal scheme in rural areas

ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे निर्देश, नेमकं काय म्हणाले?

मुंबई, 27 फेब्रवारी : राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षीत पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे 100 टक्के घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अभियान संचालक ई. रविंद्रन, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त विजय पाखमोडे आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात जलजीवन निशन अंतर्गत 20 हजार घरांना थेट नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून त्यामाध्यमातून सुमारे 80 लाख कुटुंबांना फायदा होत आहे. उर्वरित घरांना नळाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

मराठवाड्याचा दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय जल शक्ती मंत्री सी. आर पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाबाबत चर्चा केली.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा दोन बाबत देखील या बैठकीत आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात वैयक्तीक शौचालयांबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीवर भर देण्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विभागाला सांगितले. शंभर दिवसांच्या उपक्रमामध्ये हर घर जल अंतर्गत 100 टक्के नळ जोडणीचे उद्दीष्ट्य पूर्ण करावे. शाळा, अंगणवाड्यांमध्ये 100 टक्के पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘सुवर्ण खान्देश’ने चांगल्या पद्धतीने परिसरातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले – माजी आमदार दिलीपभाऊ वाघ

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindegulabrao patilhar ghar jalmumbaisahyadri atithigruh

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page