• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी तब्बल इतके टक्के सवलत, पर्यटन मंत्र्यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 1, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
MTDC offers 50 percent discount for women tourists on International Women's Day

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी तब्बल इतके टक्के सवलत, पर्यटन मंत्र्यांची माहिती

मुंबई, 1 मार्च :  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी  1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. “आई” महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले की, एमटीडीसीने महिलांसाठी समर्पित ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणले आहे. महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 2024 मध्ये एमटीडीसीच्या  महिला दिन विशेष सवलतीला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. 1500 हून अधिक महिला पर्यटकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, 2025 मध्येही ही योजना राबवण्यात येणार आहे. महिला पर्यटक www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की, पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महिला पर्यटकांसाठी हा  विशेष उपक्रम आहे  एमटीडीसीची नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि खारघर (नवी मुंबई) येथील महिला-संचालित पर्यटक निवास  पूर्णतः महिलांद्वारे संचलित केली जातात. यामध्ये रिसॉर्ट व्यवस्थापन, सुरक्षा, टॅक्सी सेवा, स्वच्छता, हॉटेलिंग आदी सर्व जबाबदाऱ्या महिलांकडेच आहेत. यामुळे महिलांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

महिला पर्यटकांसाठी ३० दिवसांची विशेष सवलत

1 ते 8 मार्च 2025 आणि वर्षभरातील इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस 50 टक्के सवलत असून या 22 दिवसांची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार. एमटीडीसी च्या पर्यटन स्थळांवर महिला बचत गटांसाठी स्टॉल्सची सुविधा दिली जाईल. महिला पर्यटकांसाठी विशेष साहसी आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

हेरिटेज वॉक, साहसी पर्यटन, शैक्षणिक सहली आणि पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण. महिला गाइड्स आणि जल पर्यटन प्रशिक्षकांना संधी दिली जाईल. महिलांसाठी विशेष खेळ आणि मनोरंजन उपक्रम देखील असतील.

महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि अनुकूल पर्यटन – प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी स्पष्ट केले की, “महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि अनुकूल पर्यटन वातावरण निर्माण करणे हा एमटीडीसीचा मुख्य उद्देश आहे. ‘आई’ धोरणामुळे महिला प्रवाशांना अधिक संधी आणि प्रोत्साहन मिळेल.

महिलांसाठी सुरक्षित आणि आनंददायी पर्यटन अनुभव – व्यवस्थापकीय संचालक  मनोजकुमार सूर्यवंशी

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले की, 8 मार्च हा  सुट्टीचा दिवस असल्याने महिला पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडतील. त्यामुळे हा उपक्रम महिलांसाठी पर्वणी ठरेल.

महिला पर्यटकांसाठी एमटीडीसीतर्फे महिलांसाठी ही एक खास संधी आहे. सवलतीसह पर्यटनाचा आनंद नक्की घ्या. ही पर्वणी चुकवू नका! 1 ते 8 मार्च 202 दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन विभागातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: International Womens DayMTDCtourismtouristswomen tourists

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

July 12, 2026
VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page