• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘या जनावरांचे चेहरे झाकण्यापेक्षा…’ केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा संतप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 2, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, मुक्ताईनगर
Union Minister Raksha Khadses daughter molested State Womens Commission Chairperson Rupali Chakankar reacts angrily

'या जनावरांचे चेहरे झाकण्यापेक्षा...' केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा संतप्त

पुणे : हे आरोपी माणसाच्या कळपातील विकृती आहे. यांचे चेहरे झाकण्यापेक्षा समाजाला दाखवले गेले पाहिजे. ही ती विकृती आहे. ही ती जनावरे आहेत. ही ती श्वापदे आहेत, या शब्दात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्या पुणे येथे माध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला, त्याबाबत मी स्वत: पोलीस निरीक्षक मोहिते यांच्याशी संपर्क केला आणि यामध्ये यातला जो टवाळखोर आहे, त्याच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आताही गुन्हा दाखल होत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं पोलीस पथकही रवाना झालं आहे. या टवाळखोरला आता तातडीने ताब्यात घेतलं जाईल.

पण गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नयेत म्हणून बीट मार्शल, दामिनी पथक, सीसीटीव्ही कॅमेरे असतात. हे सर्व असतानाही बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल. यामध्ये जो कुणी आहे, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग त्याचा पाठपुरावा करेल. यामध्ये शुक्रवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. यात्रेच्या दरम्यान, जे आकाशपाळण्यात मंत्री रक्षाताई यांची मुलगी आणि काही मैत्रिणी बसल्या होत्या आणि हा पाळणा जेव्हा गोल फिरत होता, त्या पाळण्यात टवाळखोर मुले बसली होती.

त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि फोटो काढले. त्यावेळी एक गार्ड तिथे खाली उभा होता, त्या गार्डला असं वाटत होतं की, हे काही व्हिडिओ शुट करत आहेत. ते लवकर लक्षात आलं नाही. पण खाली उतरल्यावर गार्डने त्यांना हटकलं. त्यावरुन त्यांची बाचाबाचीही झाली. गार्डने त्यांचा मोबाईल घेऊन त्याचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा त्या टवाळखोरच्या ताब्यातून घेतलेले आहेत. त्यानंतर शनिवार सुरू झाला आणि तक्रार दाखल झाली. त्यावर एफआयआर दाखल होत आहे आणि त्याला अटक केली जाईल. यापूर्वी त्याच्यावर जो गुन्हा दाखल होता, त्या गुन्ह्याची शिक्षा भोगून तो बाहेर आलेला आहे. यानंतर त्याने जे कृत्य केलं आहे. ते खरंच खूप लाजिरवाणं आहे. यामध्ये त्याला कठोर शिक्षा ही झाली पाहिजे.

मला असं वाटतं की, बऱ्याच वेळा हे आरोपी माणसाच्या कळपातील विकृती आहे. यांचे चेहरे झाकण्यापेक्षा समाजाला दाखवले गेले पाहिजे. ही ती विकृती आहे. ही ती जनावरे आहेत. ही ती श्वापदे आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे, महिलांवर अत्याचार करणारे जे कुणी असतील, त्यांना काळा कपडा घालून त्यांचे चेहरे झाकले जातात. ते न करता आता त्यांचे चेहरे दाखवावेत म्हणजे हे किती निर्लज्ज लोकं आहेत आणि माणसांच्या कळपांमध्ये राहून कशा पद्धतीने जनावरांसारखी वागतात, हे जगाला कळलं पाहिजे. खऱ्या अर्थाने, कारवाई होईल, कठोर शिक्षाही होईल. पण ही विकृती कमी झाली पाहिजे, यासाठी निश्चितपणे आम्ही पाठपुरावा करू, असे म्हणत राज्याचा गृहविभाग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य महिला आयोग आणि त्या भागातील पोलीस याबाबत निश्चितपणे कार्यवाही करतील, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..

हेही वाचा – केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाडप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची, काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: crimeMaharashtra State Comission For Womenmscwmuktainagarpolicepuneraksha khadserupali chakankar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ अतिरेक्यांशी लढावं की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं हाही मोठा प्रश्न! मंत्री गिरीश महाजनांचा राऊतांवर निशाणा

‘त्या’ अतिरेक्यांशी लढावं की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं हाही मोठा प्रश्न! मंत्री गिरीश महाजनांचा राऊतांवर निशाणा

May 16, 2025
बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा; पालकमंत्र्यांचे आदेश

बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा; पालकमंत्र्यांचे आदेश

May 16, 2025
Pachora News : “…म्हशी गोठ्यात परतल्या; पण मुलगा घरी परतलाच नाही!” माहिजीच्या 22 वर्षीय तरूणाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

Pachora News : “…म्हशी गोठ्यात परतल्या; पण मुलगा घरी परतलाच नाही!” माहिजीच्या 22 वर्षीय तरूणाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

May 15, 2025
‘महाशय, मेहरबानी करा अन् तुम्ही पंतप्रधान पदी राहू नका!’ ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राऊत नेमकं काय म्हणाले?

‘महाशय, मेहरबानी करा अन् तुम्ही पंतप्रधान पदी राहू नका!’ ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राऊत नेमकं काय म्हणाले?

May 15, 2025
‘विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट’ : नागरिकांच्या सूचना मागवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

‘विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट’ : नागरिकांच्या सूचना मागवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

May 15, 2025
‘शेतकऱ्यांनी 1 जूननंतरच पेरणी करावी’; कृषी विभागाचं आवाहन, काय आहे संपुर्ण बातमी?

‘शेतकऱ्यांनी 1 जूननंतरच पेरणी करावी’; कृषी विभागाचं आवाहन, काय आहे संपुर्ण बातमी?

May 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page