• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपींची नावं आली समोर, एकूण किती आरोपी?, पोलिसांनी सांगितली महत्त्वाची माहिती..

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 2, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, मुक्ताईनगर
Molestation of Union Minister Raksha Khadses daughter names of accused revealed how many accused police given information

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपींची नावं आली समोर, एकूण किती आरोपी?, पोलिसांनी सांगितली महत्त्वाची माहिती..

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथे मुक्ताईच्या यात्रेत झालेल्या छेडछाडप्रकरणी आतापर्यंत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणातील आरोपींची नावेही पोलिसांनी सांगितली.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात 6 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 28 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री पाऊणेनऊच्या दरम्यान, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोथळी या गावी यात्रेच्या दरम्यान, पाळण्यात बसण्याच्या दरम्यान, काही मुली त्याठिकाणी गेलेल्या होत्या. यावेळी अनिकेत भोई, पीयूष मोरे, सोहम कोळी, अनुष पाटील, किरण माळी आणि सचिन पालवे यांनी त्या मुलींचा पाठलाग करुन पाळण्यात बसलेले असताना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्काही दिला.

मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता, असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे. त्या अनुषंगाने आपण या आरोपींविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. विनयभंग, पोक्सो कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. यातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या आरोपींना तत्काळ अटक करण्यात येईल. यातील अनिकेत भोई नावाच्या आरोपीविरोधात याआधी 4 गुन्हे दाखल आहेत. बाकीचे इतर आरोपी आहेत. त्या आरोपींविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

आमच्यावर कुणाचाही दबाव नाही –

याप्रकरणातील आरोपी स्थानिक लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे. माध्यमांच्या या प्रश्नावर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले की, यामध्ये आतापर्यंत कुठल्याही स्थानिक लोकप्रतिनिधीने याप्रकरणात अद्याप संपर्क केलेला नाही. पोलीस याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही करेल. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही.

हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..

हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : ‘या सर्व गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचं संरक्षण मिळतंय’, नाव न घेता एकनाथ खडसेंचा आमदार चंद्रकांत पाटलांवर आरोप

बातमी शेअर करा !
Share
Tags: muktainagar crimemuktainagar policemuktainagar police stationraksha khadseraksha khadse news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
बहुलखेडा येथे पीएसआय संजय तडवी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप

बहुलखेडा येथे पीएसआय संजय तडवी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप

July 14, 2026
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यात 15 जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यात 15 जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page