• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

Khandesh Mla : अधिवेशनापूर्वी खान्देशातील एकमेव काँग्रेस आमदार यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 3, 2025
in नंदुरबार, खान्देश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Ahead of the budget session of maharashtra only Congress MLA from Khandesh has been given big responsibility by party

अधिवेशनापूर्वी खान्देशातील एकमेव काँग्रेस आमदार यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषदेतील गटनेते, उपनेते, मुख्य प्रतोद, प्रतोद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये खान्देशातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार असलेले शिरीषकुमार नाईक यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेसने शनिवारी महाराष्ट्र विधिमंडळातील पक्षाच्या नियुक्ती जाहीर केल्या. यामध्ये माजी राज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील हे विधान परिषदेतील काँग्रेसचे नवे गटनेते असतील तर अमिन पटेल हे विधानसभेत पक्षाचे उपनेते असतील. तसेच माजी मंत्री अमित देशमुख हे विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद, तर विश्वजित कदम यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

खान्देशातील आमदार शिरीष नाईक यांनाही मोठी जबाबदारी –

अखिल भारतीय काँग्रेसने विधानसभेतील काँग्रेसचे म्हणून खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष नाईक यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबतच संजय मेश्राम हेसुद्धा प्रतोद म्हणून काम पाहतील. तसेच विधान परिषदेत अभिजित वंजारी हे काँग्रेसचे मुख्य प्रतोद, तर राजेश राठोड हे प्रतोद असतील.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार या नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज 3 मार्चपासून सुरू होत असताना परवा शनिवारी या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपींची नावं आली समोर, एकूण किती आरोपी?, पोलिसांनी सांगितली महत्त्वाची माहिती..

हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..

हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : ‘या सर्व गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचं संरक्षण मिळतंय’, नाव न घेता एकनाथ खडसेंचा आमदार चंद्रकांत पाटलांवर आरोप

बातमी शेअर करा !
Share
Tags: congressmla shirish kumar naiknandurbarnavapur mlanavapur newsshirish kumar naikshirish naik

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page