मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यांना हे व्यक्तव्य चांगलच भोवलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे आता विधानसभेत चांगलेच भडकले तसेच त्यांनी आमदार अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मंत्री गुलाबराव पाटलांनी केली मोठी मागणी –
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी विधानसभेत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, या सभागृहात अशी काही रीत झालेली आहे, मागच्या काळात एमआयएमचे आमदार याठिकाणी म्हटले होते की, इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की, आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही. या लोकांनी काय षडयंत्र रचलं आहे की हिंदुस्तानात राहायचं, इथं मुलं पैदा करायची, इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाचे याठिकाणी पुष्टी करायचे, अशा लोकांना या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, संभाजी महाराजांच्या बाबतीत, यापद्धतीने जर हे बोलत असतील, औरंगजेबाची बढाई मारत असतील तर…काशी से कला जाती, मथुरा मे मस्जिद बनती अगर एक छत्रपती न होते तो सबकी सुन्नत होती, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असे उद्गार जर या औरंगजेबाची औलाद काढत असतील तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा केला गेला पाहिजे, अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, ज्यांनी किती लोकांचे इथे धर्मांतर केले, किती लोकांना बाटवलं, किती मंदिरे उध्वस्त केली, अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहात केली जाते. हे सभागृह आहे. धार्मिक सभागृह नाही. हे सभागृह कायदा बनवणारे सभागृह आहे. इथे जर तुम्ही कुणाची पुष्टी करत असाल ते निषेधार्ह आहे. म्हणून अबू आझमींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
आमदार अबू आझमींनी नेमकं काय म्हटलं होतं –
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचा बचाव करणारे वक्तव्य केले होते. मी 17व्या शतकातील मुघल सम्राट औरंगजेबला क्रूर, अत्याचारी किंवा असहिष्णु शासक मानत नाही. आजकाल चित्रपटांच्या माध्यमातून मुघल सम्राटाची विकृत प्रतिमा निर्माण केली जात आहे. औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचे आमदार अबू आझमी म्हणाले होते.
आमदार अबू आझमी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सभागृहात अबू आझमींच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा