• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार, 3 आरोपी अजूनही फरारच

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 5, 2025
in Uncategorized
Molestation of Union Minister Raksha Khadses daughter police custody of accused will end today three accused are still absconding

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार, तीन आरोपी अजूनही फरारच

भुसावळ : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीसोबत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या यात्रेत छेडछाड केल्याची घटना समोर आली. यानंतर या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणातील तीन आरोपींना भुसावळ विशेष सत्र न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे आज या आरोपींची पोलीस कोठडी संपणार आहे.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सोमवारी कडक पोलीस बंदोबस्तात संशयित आरोपींना भुसावळ विशेष सत्र न्यायालयात हजर केले होते. यामध्ये विशेष न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अनिकेत भोई, किरण माळी, अनुज पाटील अशी या आरोपींची नावे आहेत.

सरकारी वकिलांनी सांगितले होते की, मुक्ताईनगर घटनेच्या संदर्भातील हा बाललैंगिक अत्याचाराचा अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यामध्ये एकूण 7 आरोपींविरोधात फिर्याद दाखल आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक करुन कोर्टात हजर केले. या घटनेमध्ये ज्या मोबाईल फोनमधून या आरोपींनी चित्रीकरण केलेले आहे, तो मोबाईल जप्त करायचा आहे, इतर फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे, या कारणांसाठी पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली होती. सरकार पक्षातर्फे आणि आरोपी पक्षातर्फे यावेळी युक्तीवाद करण्यात आला. यामध्ये विशेष न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यानंतर आज ही पोलीस कोठडी संपत आहे.

आरोपींना अटक करुन 12 तास झालेले आहेत, त्यामुळे कोणतीही पोलीस कोठडीची गरज नाही, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी सोमवारी केली होती. पण सरकारी पक्षाची मागणी न्यायालयाने मान्य करत आरोपींना 5 मार्चपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आज ही पोलीस कोठडी संपत असल्याने आज कोर्टात सरकारी पक्ष किंवा आरोपी पक्ष नेमका काय युक्तिवाद केला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अद्यापही तीन जण फरार –

दरम्यान, या प्रकरणात एकूण 7 आरोपी आहेत. त्यापैकी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक जण अल्पवयीन असल्याने त्याला जळगाव येथे बालसुधार गृहात रवाना करण्यात आलेले आहे. इतर 3 फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सोमवारी दिली होती. मात्र, हे तीन आरोपी फरार असून अद्यापही त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

काय आहे घटना –

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..

हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : ‘या सर्व गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचं संरक्षण मिळतंय’, नाव न घेता एकनाथ खडसेंचा आमदार चंद्रकांत पाटलांवर आरोप

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawal special session courtcrime newsmuktainagarmuktainagar casemuktainagar crimemuktainagar latest newsmuktainagar newsraksha khadse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page