मुंबई : अजान म्हणणे हा संविधानाप्रमाणे सर्वांचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन म्हणायला पाहिजे. परंतु भोंगा हा कोणत्याही धार्मिक भावनेशी निगडीत नाही आणि त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना, कुणी आजारी असतं, कुणाच्या परिक्षा असतात, कुणी वयोवृद्ध असतं, कुणी रात्रपाळी करुन आलेलं असतं. अशा सर्वांना या भोंग्यांमुळे, ध्वनी प्रदूषणांमुळे त्रास होतो, असे म्हणत उत्तरप्रदेश सरकारप्रमाणे कारवाई करुन भोंगे उद्यापासून बंद करणार का, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला.
राज्यात प्रार्थनास्थळांवर असलेले भोंगे या विषयासंदर्भात आमदार देवयांनी फरांदे यांनी काल लक्षवेधी मांडली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले उत्तर समाधानकारक नाही. आज सर्व प्रार्थनास्थळांवरुन, मशिदींवरुन अजानच्या वेळी भोंगे लावले जातात. दिवसभरात 5-7 वेळा हे भोंगे लावले जातात. याबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही निर्णय दिला होता की, अजान म्हणणे हा संविधानाप्रमाणे सर्वांचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन म्हणायला पाहिजे. परंतु भोंगा हा कोणत्याही धार्मिक भावनेशी निगडीत नाही आणि त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना, कुणी आजारी असतं, कुणाच्या परिक्षा असतात, कुणी वयोवृद्ध असतं, कुणी रात्रपाळी करुन आलेलं असतं. अशा सर्वांना या भोंग्यांमुळे, ध्वनी प्रदूषणांमुळे त्रास होतो.
नाशिक शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी 17 एप्रिल 2022 ला तत्कालीन सरकारला एक पत्र पाठवले होते. भोंग्यांचा आवाज बंद करण्याच्या संदर्भात ते पत्र होतं. मात्र, त्या काळात उद्धव ठाकरेंच्या सरकारने त्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. पण ते पत्र मीडियात व्हायरल झालं आणि उत्तरप्रदेशात योगींजींच्या सरकारने तत्काळ त्यावर कारवाई करत 19 एप्रिल 2022 रोजी त्या विषयाबाबत कारवाई केली आणि उत्तरप्रदेशातील भोंगे हे पूर्णत: बंद करण्यात आले.
एखाद्या सणाच्या दिवशी प्रार्थनास्थळांवरील भोग्यांना आपण विशिष्ट परवागनी देऊ शकतो. पण रोजची दैनंदिन जी प्रार्थना असते, दिवसभरात 6-6 वेळा त्याठिकाणी भोग्यांवरुन अजाण म्हटली जाते. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. त्यामुळे या विषयासंदर्भात राज्य सरकार हे उत्तरप्रदेश सरकारप्रमाणे कारवाई करुन भोंगे उद्यापासून बंद करणार का, तसेच ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रार्थनास्थळांवरील भोंगे लावले जातील त्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांवर याची जबाबदारी फिक्स करुन सरकार या पीआयच्या बाबतीत जर नागरिकांमधून तक्रार आली तर त्यांच्यावर तत्काळ कार्यवाही करणार का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला.