• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

देहूत श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 16, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
देहूत श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान

देहू (पुणे), 16 मार्च : देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375 वा बीज सोहळा आज पार पडतोय. या सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी देहू संस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, संत तुकाराम महाराज मूर्ती, पुष्पहार, चिपळ्या, संत गाथा आणि सन्मानपत्र एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात आले. यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार तथा शिवसेना उपनेते विजय शिवतारे तसेच वारकरी उपस्थित होते.

देहू संस्थानच्यावतीने उपमुख्यमंत्री शिंदेंचा सन्मान –
एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि ‘निर्मल वारी, हरित वारी’ संकल्पनेत योगदान दिले होते. दरम्यान, त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यासोबतच शिंदे यांनी पालखी सोहळ्यातील दिंड्यांना आर्थिक सहाय्य, स्वच्छता मोहिमा आणि इतर सेवा- सुविधांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. दरम्यान, गेल्या 25 वर्षांपुर्वी हाच सन्मान माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, माझ्या मनात एक आनंद निर्माण झाला आहे. वारकऱ्यांविषयी आधी जो आदर होता. तो आता अधिक वृद्धिंगत झालाय. जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार हा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पुरस्कार देहूच्या संस्थेना दिला. यामुळे मी देहू संस्थांच्या विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. खरंतर, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिण-भावांचा, जेष्ठांचा या सर्वांचा आहे.

म्हणून समाजाची सेवा अधिक जोरकसपणे करण्याची प्रेरणा पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली आहे. वारकऱ्यांची संधी मला या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली असून वारकऱ्यांसाठी काम करण्याची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची याठिकाणी भेट झाली होती. आणि अशा पवित्र भूमीत मला पुरस्कार मिळतोय, याच्यापेक्षा दुसरे भाग्य नसल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

देहूत तुकाराम बीज निमित्त सोहळा –
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या बीज सोहळा आज देहूत पार पडतोय. दरम्यान, तुकाराम बीज निमित्त लाखो वारकरी आज देहूत दाखल झाले आहेत. आज दुपारी ठीक बारा वाजता कीर्तन झाल्यानंतर नांदूरकीच्या झाडावर वारकरी पुष्प अर्पण करताच हा सोहळा पार पडणार आहे.

हेही वाचा : घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm eknath shindedehushri sant tukaram maharaj awardsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page