• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात अवकाळीने मोठं नुकसान, पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 29, 2023
in जळगाव जिल्हा, खान्देश
जळगाव जिल्ह्यात अवकाळीने मोठं नुकसान, पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

जळगाव, 29 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर आणि जळगाव तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेत पिकांबरोबरच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावे, असे आदेश राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच शासन नियमानुसार नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द आहे, असेही ते म्हणाले.

मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

गेल्या दोन दिवसांपासून जळगाव तालुक्यातील गावांमध्ये होत असलेल्या वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळवून दिली जाईल, असे ते म्हणाले.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद, बेळी, निमगांव, उमाळे, देव्हारी, चिंचोली परिसरात वादळी पाऊस आणि वाऱ्याने दिलेल्या जोरदार तडाख्यात मोठ्या प्रमाणात केळी, लिंबू, पपई आदि पिकांसोबतच झाडे उन्मळून पडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानी संदर्भात शेतकरी, ग्रामस्थ यांचेशी चर्चा केली. यावेळी त्यांनी तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

त्याचबरोबर ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना निवाऱ्याची व्यवस्था करण्याची सुचनाही पालकमंत्री यांनी दिली. बेळी, निमगांव आणि नशिराबाद येथे वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आवश्यकता भासल्यास गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टँकरने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी चिंचोली परिसरात वादळी वाऱ्याने कंटेनर पलटी होऊन मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणी भेट दिली. तसेच या ठिकाणी असलेल्या बिहार येथील कामगारांची भेट घेऊन त्यांना तात्पुरता निवारा व जेवणाची व्यवस्था करण्याबाबतही यंत्रणेला सांगितले.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसिलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जिल्हा कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषि अधिकारी शिवाजी राऊत, महावितरणचे श्री. आवटे, विस्तार अधिकारी पी. बी. अहिरे, स्थानिक लोकप्रतिनिधींसह संबंधित गावांचे ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी काय म्हणाले –

यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल म्हणाले की, ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्यात येत असून ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत. त्यांची नावे घरकुलांच्या ड यादीत असल्यास त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर केले जाईल. तसेच महसुल व कृषि विभागाच्या यंत्रणेमार्फत नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर केला जाईल, असेही सांगितले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patilgulabrao patil in jalgaongulabrao patil newsheavy rain jalgaonjalgaon rain news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

June 27, 2026
‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

June 27, 2026
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

June 27, 2026
अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई; मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार – मंत्री प्रताप सरनाईक

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई; मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार – मंत्री प्रताप सरनाईक

June 26, 2026
खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक; अतिरिक्त शुल्क घेतल्यास कारवाई – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक; अतिरिक्त शुल्क घेतल्यास कारवाई – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

June 26, 2026
खान्देश जलसमृद्ध होण्यासाठी जलाशयांच्या खोलीकरणाचा प्रस्ताव; शेतकरी सेनेची अभिनव संकल्पना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खान्देश जलसमृद्ध होण्यासाठी जलाशयांच्या खोलीकरणाचा प्रस्ताव; शेतकरी सेनेची अभिनव संकल्पना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page