नागपूर, 30 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी मोदींचे स्वागत करण्यासाठी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. नरेंद्र मोदी यांनी सुरूवातील रेशीमबागेत आणि त्यानंतर दीक्षाभूमी येथे भेट दिली. यासह त्यांचे हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन तसेच लोकार्पण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज सकाळी ते नागपुरात दाखल झाले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी रेशम बाग येथील संघाच्या मुख्यालयाला भेट देत आणि संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालायात भेट देणारे ते दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. यापर्वी, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी याठिकाणी भेट देली होती. रेशीमबागनंतर दीक्षाभूमीमध्ये दाखल –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिरात दर्शन घेतलं. यानंतर ते दीक्षाभूमीमध्ये गेले. दीक्षाभूमीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन केले. तसेच भगवान गौतम बुद्ध यांना मोदी यांनी नमन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी दीक्षाभूमी येथे 15 मिनिटांचा कालावधी घालविला. दरम्यान, 14 एप्रिल 2017 रोजी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. दरम्यान, तब्बल आठ वर्षानंतर मोदीजी दीक्षाभूमीवर आले.
2000 साली अटल बिहारी वाजपेयींनी दिली होती भेट –
नरेंद्र मोदी यांच्या आधी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 27 ऑगस्ट 2000 रोजी रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली होती. यावेळी नागपुरात भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडत होते. आणि याच अधिवेशनातून वेळ काढून पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरात गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेत त्यांच्या स्मृतीला पुष्पांजली वाहिली होती. स्मृती मंदिराला भेट देणारे अटल बिहारी वाजपेयी हे पहिले पंतप्रधान ठरले होते. यानंतर थेट 25 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांनी रेशीमबागेत भेट देण्याची ही दुसरी वेळ आहे.