• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“शिक्षण म्हणजेच समाज परिवर्तनाची खरी गदा”, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 12, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
“शिक्षण म्हणजेच समाज परिवर्तनाची खरी गदा”, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार

जळगाव, 12 एप्रिल : हनुमान जयंतीसारख्या पवित्र दिवशी शिक्षकांचा गौरव होणं ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. “शिक्षण म्हणजेच समाज परिवर्तनाची खरी गदा आहे. ही गदा जर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती दिली, तर तो स्वतःच्या आयुष्याचा ‘राम’ बनू शकतो,” असे उद्गार त्यांनी काढले.

शाळा गुणवत्तापूर्णही असाव्यात –
मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या राज्यस्तरीय उपक्रमामुळे समाजाचा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून अनेक जिल्हा परिषद शाळा आधुनिक शिक्षण केंद्रात रूपांतरित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. फक्त शाळा स्वच्छ आणि सुंदर असणे पुरेसे नाही, तर त्या गुणवत्तापूर्णही असाव्यात. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने पटसंख्या वाढवून गुणवत्ता उन्नतीचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

10 लाखांचा आमदार निधी देण्याची घोषणा –
पालकमंत्री पाटील यांनी जळगाव ग्रामीणमधील पटसंख्या वाढविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना १० लाखांचा आमदार निधी देण्याची घोषणा यावेळी केली. या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे यांचीही उपस्थिती लाभली होती.

गुणवत्ताधारित शाळांचा सन्मान –
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत तालुका व जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांचा सत्कार नियोजन भवन, जळगाव येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पिलखेडा, तरसोद, वितानेर तसेच माध्यमिक स्तरावरील अनुभूती इंग्लिश स्कूल, शानबाग माध्यमिक विद्यालय (सावखेडा), सार्वजनिक विद्यालय (आसोदा), माध्यमिक विद्यालय (करंज) या शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांचा सत्कार स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे विचार –
कार्यक्रमात डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा गौरव करताना, इतर शाळांनी त्यांचे अनुकरण करावे, असे सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, इ. 2 री ते 5 वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी 5 मार्च 2025 रोजी राज्य शासनाने निर्णय निर्गमित केला असून त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

“हा शासन निर्णय म्हणजे शिक्षण विभागाचा मूलमंत्र आहे. त्याचे सर्व शिक्षकांनी काळजीपूर्वक वाचन करावे व पालन केल्यास शाळा 100 टक्के गुणवत्ता युक्त होतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमात शिक्षकांना त्यांच्या कार्याचे समाजापुढे सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून चावडी वाचनाद्वारे गुणवत्ता सुधारत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मान्यवरांची उपस्थिती –
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी केंद्रप्रमुख सुशील पवार यांनी केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी मानले.

यावेळी आमदार राजूमामा भोळे, डॉ. अनिल झोपे, विकास पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, ग.स. संचालक तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, खालील शेख यांच्यासह जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : Breaking : जवानाकडे लाच मागणे ‘त्या’ दोन पोलिसांना भोवलं, जळगाव एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patiljalgaon newsmukhyamantri majhi shala sunder shalasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

August 18, 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

August 18, 2026
ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

August 18, 2026
VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

August 17, 2026
राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

August 17, 2026
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

August 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page