मुक्ताईनगर, 28 एप्रिल : लाडक्या बहिण योजनेमुळे महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाल्याचे सत्ताधारी पक्षातील मंत्री तसेच नेते अनेक वेळा सांगतात. मात्र, महायुती सरकारमधील मंत्री ज्यावेळी लाडकी बहिण योजनेबाबत वक्तव्य करतात, त्यावेळी लाडकी बहिण योजनेबाबत महायुती सरकारच्या भूमिकेबाबत विरोधकांकडून सवाल उपस्थित केला जातो. असे असताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेल्या लाडकी बहिण योजनेबाबतच्या वक्तव्यामुळे महायुती सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलंय.
मुक्ताईनगरात मंत्री नरहरी झिरवळ काय म्हणाले? –
मुक्ताईनगरात अजित दादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अमृतकलश यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मंत्री नरहरी झिरवळ आले असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, लाडक्या बहिणांना 2100 रूपये देऊ, असे कोणीही जाहीर केलेले नाही. आधी तर लाडक्या बहिणींना 1500 रूपये दिले जाणार नाहीत, अशी टीका विरोधकांना केली जात होती. यानंतर 2100 रूपये देणार आहेत…हेच विरोधकांकडून सांगितले जात आहे.
View this post on Instagram
2100 रूपयांची घोषणा सरकारने केलीच नाही –
लाडक्या बहिणींना 2100 रूपये देऊ, अशी कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही. लाडक्या बहिणी 1500 रूपयांवरही खूश आहेत, असेही अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री झिरवळांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जाण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी? –
राज्य सरकारच्यावतीने मागील वर्षी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. दरम्यान, आता एप्रिल महिन्याचा लाडक्या बहिण योजनेचा हप्ता अक्षतृतीयेपर्यंत मिळणार, असे सांगितले जात आहे,
हेही पाहा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश