• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जागतिक माध्यम संवाद २०२५ : सदस्य राष्ट्रांद्वारे वेव्हज जाहीरनाम्याचा स्वीकार

संबंधित कौशल्य विकासाद्वारे सर्जनशील सहकार्याच्या युगासाठी तरुण प्रतिभावंत तयार करणे महत्त्वाचे : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 3, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
Adoption of the Waves Declaration by Member States in Global Media Dialogue 2025

जागतिक माध्यम संवाद २०२५ : सदस्य राष्ट्रांद्वारे वेव्हज जाहीरनाम्याचा स्वीकार

मुंबई, 3 मे : “सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे.” सध्या सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान (वेव्हज २०२५) मुंबईत झालेल्या जागतिक माध्यम संवादाच्या अनेक निष्कर्षांपैकी हा एक निष्कर्ष होता. डिजिटल दरी कमी करण्याच्या मार्गावर आपण सर्वजण वाटचाल करत असताना देशांमध्ये सर्जनशील जागा वाढवणे ही आपल्या सामूहिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, याची अनुभूती संवादात सहभागी झालेल्या राष्ट्रांनी घेतली. वाढत्या जागतिकीकरण झालेल्या माध्यम वातावरणात जागतिक शांतता आणि सौहार्द वाढविण्यासाठी सरकारांच्या भूमिकेवर हा संवाद केंद्रित होता, ज्याची सांगता सदस्य राष्ट्रांनी वेव्हज जाहीरनामा स्वीकारून झाली.

जगभरातील संस्कृतींचे चित्रण करणारे चित्रपट लोकांमधील जिव्हाळा वाढवण्याची प्रचंड क्षमता बाळगतात या भावनेला जागतिक माध्यम संवादाने प्रतिध्वनीत केले आणि सहभागी राष्ट्रांनी या संदर्भात भारतीय चित्रपटांच्या भूमिकेची प्रशंसा केली. कथाकथनाचे एक मनोरंजक स्वरूप म्हणून, चित्रपट परस्परांशी सहयोग करण्यासाठी बलशाली ठरतात. कथाकथनाच्या कलेत तंत्रज्ञानाचा संगम मनोरंजन जगाला पुन्हा परिभाषित करत असताना, सर्जकांच्या अर्थव्यवस्थेत बलशाली म्हणून वैयक्तिक कथा देखील वेगाने उदयास येत आहेत. काही सदस्य राष्ट्रांनी “जबाबदार पत्रकारितेला” प्रोत्साहन देण्याच्या गरजेबद्दल चिंता व्यक्त केली. वेव्हज च्या मंचावर परस्पर सहकार्याने यावर तोडगा निघेल असे त्यांना वाटले.

वेव्हज २०२५ ला जागतिक समुदायाचे सूक्ष्म जग म्हणून संबोधित करताना, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, ही शिखर परिषद माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी भविष्यातील रूपरेषा ठरवण्यासाठी सर्जक, धोरणकर्ते, अभिनेते, लेखक, निर्माते आणि पडद्यावरील कलाकारांना एका समान मंचावर एकत्र आणते.

जागतिक माध्यम संवाद, २०२५ मधील आपल्या भाषणादरम्यान डॉ. जयशंकर यांनी विचाराधीन असलेल्या व्यापक रूपरेषांवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की जागतिक व्यवस्था, ज्याला एक मजबूत सांस्कृतिक आयाम आहे, आज परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे. “आपल्या परंपरा, वारसा, कल्पना, पद्धती आणि सृजनशीलतेला आवाज देणे आवश्यक आहे”, असे ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की तंत्रज्ञान आणि परंपरा यांनी हातात हात घालून चालले पाहिजे, कारण तंत्रज्ञान आपल्या विशाल वारशाबद्दलची जागरूकता आणि त्याबद्दलच्या जाणीवेची सघनता वाढवू शकते, विशेषतः तरुण पिढ्यांसाठी. “संबंधित कौशल्य विकासाद्वारे तरुण प्रतिभेला सर्जनशील सहकार्याच्या युगासाठी सज्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विकसित भारत उभारण्याच्या दृष्टीने झेप घेण्यासाठी नवोन्मेष ही गुरुकिल्ली आहे”, असे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. जयशंकर म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयोन्मुख युगात शक्यता या कल्पनेच्याही पलीकडे आहेत, तरीही पक्षपात कमी करून, सामग्रीचे लोकशाहीकरण करून तसेच त्याच्या नीतिमत्तेला प्राधान्य देऊन उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर करण्याची आवश्यकता आहे. “जागतिक कार्यस्थळ आणि जागतिक कार्यबलासाठी मानसिकता, चौकट, धोरणे आणि पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहेत”, अशा शब्दांत त्यांनी जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासमोरील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करताना वेव्हजवर विश्वास असल्याचा पुनरुच्चार‌ केला.

आपल्या स्वागतपर भाषणात संवादाचा सूर निश्चित करत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरणा देते, जी सीमा ओलांडून लोकांना जोडते. त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानामुळे आपल्या कथाकथनाच्या पद्धतीत बदल होत असल्याने सामग्री निर्मिती आणि वापरही वेगाने बदलत आहेत. आपण अशा वळणावर आहोत जिथे आपल्याला स्थानिक सामग्री निर्मितीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

७७ देशांमधील प्रतिनिधींचे स्वप्ननगरी मुंबईत स्वागत करताना वैष्णव यांनी सहकार्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. सामायिक यशासाठी आपण सर्वांनी सह निर्मिती विषयक करार, संयुक्त निधी आणि घोषणापत्र यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानातील तफावत दूर होईल, बंधुभाव, जागतिक शांतता आणि सौहार्द्र वाढीस लागेल असे ते म्हणाले. अशाप्रकारे आपल्याला सर्जनशीलतेचा वैश्विक सेतू नवकल्पनांच्या महामार्गापर्यंत विस्ताराला पाहिजे, असे वैष्णव यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चासत्रात, मंत्रीस्तरीय वरिष्ठ प्रतिनिधींनी आपली मते मांडली. वेव्हज परिषदेच्या पहिल्या हंगामात क्रिएट इन इंडिया चॅलेंज उपक्रमाअंतर्गत झालेल्या ३२ स्पर्धांमधून जगभरातील ७०० अव्वल आशयकर्ते जगासमोर आले आहेत, अशी माहिती भारताने सहभागी देशांना दिली. तसेच पुढील हंगामापासून हे चॅलेंज २५ जागतिक भाषांमध्ये घेतले जाईल ज्यामुळे जगभरातील विविध भाषांमधील सर्जनशील प्रतिभा ओळखता येईल, यामुळे त्यांना वेव्हजच्या मंचावर त्यांच्या सर्जनशील आशयाचे सादरीकरण करता येईल, असेही भारताने सांगितले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि भारत सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

हेही पाहा : ओळख प्रशासनाची : ग्रामपंचायत विभागाचं कामकाज कसं चालतं?, Dy. CEO भाऊसाहेब अकलाडे यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: communicationmediawaveswaves 2025waves 2025 conference

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 15, 2026
Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

January 15, 2026
Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

January 15, 2026
एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

January 15, 2026
Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

January 15, 2026
जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

January 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page