• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय नारीशक्तीचे अद्भूत दर्शन; अखेर, कोण आहेत ‘ह्या’ महिला अधिकारी ज्यांनी पुराव्यांसह केला पाकिस्तानचा पर्दाफाश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 7, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय नारीशक्तीचे अद्भूत दर्शन; अखेर, कोण आहेत ‘ह्या’ महिला अधिकारी ज्यांनी पुराव्यांसह केला पाकिस्तानचा पर्दाफाश

नवी दिल्ली, 7 मे : काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. भारतीय वायुदल, सैन्यदल तसेच नौदल यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत काल मध्यरात्री पाकिस्तान तसेच पाक व्याप्त हद्दीतील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करत उद्ध्वस्त करण्यात आली. दरम्यान, आज ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी भारतीय सैन्यदलातील कर्नल सोफिया कुरेशी आणि वायु दलातील विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांनी भारत सरकारसह संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देत या महिला अधिकाऱ्यांनी पुराव्यांसह पाकिस्तानचा पर्दाफाश केला. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर कशा प्रकारे हल्ला करून त्यांना धडा शिकवला, हे देखील त्यांनी जगाला ठणकावून सांगितलंय.

कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी? –
कर्नल सोफिया कुरेशी ह्या भारतीय सैन्यदलात कर्नल पदावर कार्यरत आहेत. सोफिया यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला असून त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच 1999 साली वयाच्या 17 व्या वर्षी त्या सर्व्हिस सिलेक्शन कमिशनद्वारे भारतीय सैन्यात दाखल झाल्या होत्या. यानंतर त्यांनी चैन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण पुर्ण करत लेफ्टनंट पदावर त्या रुजू झाल्यात. यासोबतच, सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातही सैन्याची मोठी परंपरा असून त्यांचे आजोबा लष्करात होते. तसेच सोफिया यांचे पती सैन्य दलात मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत. दरम्यान, एक्सरसाइज फोर्स 18 तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या त्या लष्करातील पहिल्या महिला अधिकारी आहेत.

कर्नल सोफिया काय म्हणाल्या? –
पाकिस्तानात तीन दशकांपासून दहशतवादी तळे उभी केली जात आहेत. हे तळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पसरलेले आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च केले आणि नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत? –
व्योमिका सिंह यांनी बालपणापासून हवाई दलात जाण्याचं स्वप्न पाहिलं. म्हणून शालेय जीवनातच त्या राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC) मध्ये सहभागी झाल्या. यासोबतच व्योमिका यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पुर्ण केलं. दरम्यान, त्यांनी 18 डिसेंबर 2019 रोजी भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग ब्रँचमध्ये हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्ती मिळवत आपल्या कुटुंबातील सशस्त्र दलात सहभागी होणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या.

व्योमिका यांनी ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू-काश्मीरसारख्या कठीण प्रदेशात चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर उडवले असून आतापर्यंत अडीच हजार तासांपेक्षा जास्त हेलिकॉप्टर उडवले आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक बचाव कार्यात महत्वपुर्ण कार्य केलंय. सध्या त्या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट असून आज सिंदूर ऑपरेशनबाबत पत्रकार परिषेदत माहिती देताना त्यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावलीय.

विंग कमांडर व्योमिका सिंग काय म्हणाल्या? –
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी काल मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यावेळी नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते यशस्वीपणे नष्ट करण्यात आले.  तेथील नागरिकांना किंवा तेथील इतर इमारतींना कोणतीही इजा पोहोचू नये, या गोष्टीची काळजी दहशतवाद्यांचे तळ निवडताना घेतली गेली,  अशी माहिती विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचं मॉनिटरिंग अन् दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ‘एअर स्ट्राईक’; मध्यरात्री Operation Sindoor मध्ये नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: colonel sofia qureshimarathi newsoperation sindoorpress briefingsuvarna khandesh livewing commander vyomika singh

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page