जळगाव, 24 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णव हगवणे हिने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप हगवणे कुटुंबियावर लावला जातोय. तसेच वैष्णव हगवणे मृत्यूप्रकरण समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर अजित दादांच्या राष्ट्रवादीवर देखील टीका करण्यात आली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी केली.
View this post on Instagram
गुलाबराव पाटील यांची सूचक प्रतिक्रिया –
राजेंद्र हगवणे यांच्यासारखे नालायक व्यक्तींची पक्षात गरज नाहीये, असे म्हणत अजित पवारांनी त्यांची हकालपट्टी केली. याबाबत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारले असते ते म्हणाले की, मी नेहमीच अजि पवारांना सांगितलंय की, तुम्ही जे पक्षात ते पण तपासा. जळगाव जिल्ह्यातील जे लोकं तुम्ही पक्षात घेतले त्यांना देखील तपासले पाहिजे. काही दिवसांनी त्यांचे देखील असेच पडदे बाहेर निघाणार आहेत.
वैष्णव हगवणे मृत्यूप्रकरण –
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. दरम्यान, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिच्या वडिल अनिल कस्पटे यांनी केलाय. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने तसेच एक फॉर्च्यूनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या होत्या.
यानंतर वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. तसेच तिला घरातूनही बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे कस्पटे यांनी म्हटलंय. याप्रकरणी वैष्णवीच्या नवरा, दीर तसेच नणंद आणि सासू-सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.