• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 7, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, मुक्ताईनगर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

मुक्ताईनगर, 6 जून : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करत त्यांनी पालखीचे पूजन केले आणि स्वतः पालखीचे सारथ्य करून या ऐतिहासिक अध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.

यांची होती उपस्थिती –
या प्रसंगी आमदार एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संत मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी व भक्तगण उपस्थित होते.

भाग्याचे व गौरवाचे क्षण –
पालखीचे सारथ्य केल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वारकरी परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे. आज आपल्याला संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे सारथ्य करायला मिळाले, पालखी वाहण्याची संधी मिळाली. आज मला ही सेवा मिळणे हे अत्यंत भाग्याचे व गौरवाचे क्षण आहेत. संत मुक्ताबाई, सर्व संत, आणि विठ्ठल चरणी एकच प्रार्थना – चांगला पाऊस पडू द्या, शेती बहरू द्या, शेतकरी सुखी होऊ द्या आणि संपूर्ण राज्य समृद्ध होऊ द्या.

पालख्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन स्तरावर तयारी –
पंढरपूर वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व पालख्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन स्तरावर आवश्यक ती तयारी करण्यात आली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, सर्व पालखी प्रमुखांची बैठक शासनाने घेतली असून त्यामध्ये सोहळ्याचे वेळापत्रक, वाहतूक व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, पालखी तळांवरील आवश्यक सोयी-सुविधा आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.


याशिवाय महिलावर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था व त्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जात आहेत. वारकरी संप्रदायाचे जतन आणि संवर्धन हे शासनाचे कर्तव्य असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. पालखी मार्गावरील ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्नानगृहे व्यवस्था यासारख्या गोष्टींचे काटेकोर नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुक्ताईनगर येथून प्रस्थान केलेली संत मुक्ताबाईंची पालखी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करत असून तापी तिरा पासून चंद्रभागेच्या तिरापर्यंत जाणारी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतराची पालखी आहे.पालखीच्या प्रत्येक टप्यावर प्रशासन सज्ज असून, राज्य सरकार वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

बहिणींनी बांधल्या राख्या –
बोदवड, जामनेर रस्त्यावरील नवीन मंदिरात पालखी आली असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिकात्मक काही बहिणींनी समोर येऊन राख्या बांधल्या.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आचरणात आणा- आमदार अमोल खताळ

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm eknath shindemuktainagar newssant muktabaisant muktabai palakhisuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page