• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 25, 2025
in जळगाव जिल्हा, Uncategorized, जळगाव शहर, ताज्या बातम्या
आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव, 25 जून : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पबचत भवन, जळगाव येथे “आणीबाणी @50” हे विशेष माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडले.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि त्यावरील मांडणीचे कौतुक केले.

जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील माहिती करून देताना
जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील माहिती करून देताना

प्राचीन ते वर्तमान – लोकशाहीचा प्रवास –

या विशेष प्रदर्शनात भारतातील प्राचीन लोकशाही संकल्पनांपासून ते १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीपर्यंतचा व त्यानंतरचा प्रवास माहिती फलकांच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. महाजनपद काळातील लोकसहभाग, बुद्धकालीन राजनीती, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य, महात्मा बसवेश्वर यांचा अनुभव मंडप, ईशान्य भारतातील स्वशासन, भारताचे स्वातंत्र्य, संविधान, प्रजासत्ताक भारत आणि त्यानंतरची आणीबाणीतील राजकीय-समाजपरिवर्तन घडामोडी याचे यथार्थ दर्शन या माध्यमातून घडवण्यात आले आहे.

प्रदर्शनामध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यात जे बदल घडले, त्या काळात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या आठवणी, दस्तऐवज, छायाचित्रे, वर्तमानपत्र कात्रणे, तसेच आणीबाणीत सहभागी व्यक्तींची नावे व योगदान यांचा समावेश आहे.

विशेष प्रदर्शनाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पाहणी करताना
विशेष प्रदर्शनाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पाहणी करताना

दस्ताऐवज आणि दृश्य माध्यमांचा प्रभावी वापर –

या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कालक्रमानुसार मांडणी केलेले घटनाक्रम, त्या काळातील राजकीय निर्णय आणि त्याचे लोकशाहीवर झालेले परिणाम यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारे माहिती फलक. त्याशिवाय संविधानिक मूल्ये, मुलभूत अधिकारांचे उल्लंघन, माध्यमांवरची नियंत्रणाची परिस्थिती, अटकसत्रे आणि सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरणही या प्रदर्शनात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी या प्रदर्शनाच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष मांडणीपर्यंतचे सविस्तर विवेचन उपस्थित मान्यवरांना दिले.

आणीबाणीच्या काळातील आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या कात्रणांची माहिती घेताना मंत्री गिरीश महाजन
आणीबाणीच्या काळातील आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या कात्रणांची माहिती घेताना मंत्री गिरीश महाजन

लोकसहभागासाठी खुले निमंत्रण –

या प्रदर्शनाला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व माहिती विभागातर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून पुढील काही दिवस खुले राहणार आहे.

हेही वाचा :  Pachora News : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, पाचोरा शहरातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: completion of 50 years of the emergencygirish mahajanjalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page