• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“Thackerey is the Brand!” हिंदी सक्तीच्याविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार; संजय राऊतांच्या ‘एक्स’ पोस्टनं वातावरण तापलं!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 27, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“Thackerey is the Brand!” हिंदी सक्तीच्याविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार; संजय राऊतांच्या ‘एक्स’ पोस्टनं वातावरण तापलं!

मुंबई, 27 जून : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची भूमिका हाती घेतली असून ते दोघेही येत्या 5 जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात एकत्र सहभागी होणार आहेत. याबाबतचमी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे त्यांनी एक्सवर पोस्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केल्यानं राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांची एक्स पोस्ट –

खासदार संजय राऊतांनी ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढण्याबाबत पहिले मराठीत ट्विट केले होते. त्यानंतर लगेच संजय राऊतांनी इंग्रजीत दुसरे ट्विट केलंय. जय महाराष्ट्र म्हणत, महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे हे ब्रँड आहेत, असं त्यांनी ‘या’ पोस्टमध्ये म्हटलंय. तसेच या पोस्टमध्ये थेट केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राऊतांनी टॅग केलंय.


खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले? –

माध्यमांसोबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मला राज ठाकरे यांचा फोन आला आणि त्यांनी त्यांची भूमिका सांगितली. मराठी माणसाचे दोन मोर्चे निघणे बरे दिसत नाही आणि म्हणून एकत्र आंदोलन झाले तर प्रभाव पडेल, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. मी यानंतर मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना राज ठाकरे जे काही बोलले ते सांगितले. यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठीचे ऐक्य दिसणे गरजेचे आहे. म्हणून त्यानंतर दोघांनाही एकत्र मोर्चा काढण्याचे ठरवलं. दरम्यान, दोघांचा मोर्चा 5 तारखेला निघणार असून सकाळी 10 ची वेळ योग्य नाही आम्ही याबाबत चर्चा करू…वेळेच्या बाबतीत काही चर्चा करू, अशी माहिती संजय राऊतांनी मांडलीय.

मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार –

हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले असून राज ठाकरे पुरस्कृत मोर्चा 5 जुलैला तर 7 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीच्या एल्गाराची घोषणा करण्यात आली होती. मात्र, हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे काढण्याऐवजी एकत्रित एकच मोर्चा काढावा, यासाठी प्रयत्न सुरु होते. अशातच आज राज्यसभा खासदार संजय राऊतांनी मोठी घोषणा करत येत्या 5 जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा : मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

बातमी शेअर करा !
Share
Tags: hindi compulsionmarathi newsmarchraj thackeraysuvarna khandesh live newsuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page