चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले असून आज या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या दुसरा दिवशी विधानसभा सभागृहात मोठा गोंधळ झाला. सभागृहाचे वातावरण तापले. यामध्ये नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षांनी एका दिवसासाठी निलंबित केले.
षिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यवरून सभागृहात आज गदरोळ झाला. यानंतर नाना पटोले यांचे एक दिवसासाठी निलंबन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही कारवाई केली. प्रश्नोत्तरांच्या तासानंतर नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तत्पूर्वी, विधानसभेचे कामकाज 5 मिनिटांसाठी कामकाज स्थगित करण्यात आले
काय म्हणाले नाना पटोले –
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि विधानसभा सदस्य बबनराव लोणीकर हे सातत्याने शेतकऱ्याचा अपमान करत आहेत. हा अपमान शेतकरी सहन करणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्याचा बाप होऊ शकत नाही. या पद्धतीचे वक्तव्य अजिबात चालणार नाही. याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर? –
तुमच्याकडून असंसदीय भाषेचा वापर होणं मला बरोबर वाटत नाहीत. खरंतर नाना भाऊ पटोले या सभागृहाचे अध्यक्ष राहिले आहेत. ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी, यासंदर्भातील रुलिंग झालं. त्यामुळे नानाभाऊ मला तुम्ही तुम्ही पुढची कार्यवाही करायला मजबूर करू नका. आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू राहण्यासाठी मला पुढची कारवाई करावी लागेल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
तर विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून गेल्यामुळे नाना भाऊंनी माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर नाना पटोले यांच्या एक दिवसासाठी निलंबित केल्याच्या घोषणेनंतर विरोधकांनी सरकारविरोधात जोरधार घोषणाबाजी केली.