• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेत विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान; काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 11, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
मॉडेल सौर ग्राम स्पर्धेत विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान; काय आहे संपुर्ण बातमी?

जळगाव, 11 जुलै : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेसाठी राज्यातील सहा जिल्ह्यातील 63 गावांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांपैकी सहा महिन्यात सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या गावाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

आतापर्यंत 14 गावे सौर ग्राम –

राज्यातील शंभर गावांना सौर ऊर्जेचा वापर करून ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यासाठीची सौर ग्राम योजना महावितरणने यापूर्वीच सुरू केली असून त्याच्या अंतर्गत आतापर्यंत 14 गावे सौर ग्राम झाली आहेत. महावितरणच्या योजनेखेरीज आता केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेमुळे गावांना ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यास अधिक चालना मिळणार आहे. महावितरणला मॉडेल सौर ग्राम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

स्पर्धेचा कालावधी सहा महिन्यांचा –

किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांना मॉडेल सौर ग्राम योजनेसाठीच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी आहे. विविध जिल्ह्यांमध्ये गावे निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या सहा जिल्ह्यातील काही गावांची योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना घरोघरी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंतर्गत छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच त्या गावातील पथदिवे सौर ऊर्जेवर चालविणे, गावाची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालविणे अशी विविध कामे सरकारी योजनांच लाभ घेऊन करण्यात येतील. ही स्पर्धा सहा महिने चालणार आहे.

जिल्ह्यातील विजेत्या गावाला एक कोटी रुपयांचे अनुदान –

संबंधित ग्राम पंचायतींनी गावकऱ्यांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहन देणे तसेच सार्वजनिक योजनांसाठी सौर ऊर्जेचा वापर करणे अपेक्षित आहे. स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर त्या त्या गावात एकूण किती सौर ऊर्जा क्षमता निर्माण झाली याचा अभ्यास करून जिल्ह्यातील विजेत्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.


गावांची निवड कशी होते? –

मॉडेल सौर ग्राम योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सहा, अकोला जिल्हयातील 26, भंडारा जिल्ह्यातील सहा, बुलढाणा जिल्ह्यातील 15, वर्धा जिल्ह्यातील नऊ आणि गोंदिया जिल्ह्यातील एका गावाची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये स्पर्धेला सुरुवात झाली आहे व जिल्ह्यानुसार नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत मुदत आहे. योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करून त्या समितीमार्फत जिल्ह्यामध्ये योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी देखरेख व समन्वय करण्यात येत आहे. या समितीकडून सुरुवातीला गावांची निवड करण्यात येते व त्या गावांमध्ये स्पर्धा होते.

दोन लाखाहून अधिक वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेत महिना तीनशे युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे या हेतुने घरावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक किलोवॅटला तीस हजार रुपये, दोन किलोवॅटला साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅटला 78 हजार रुपये अनुदान मिळते. राज्यात आतापर्यंत दोन लाखाहून अधिक वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

हेही वाचा : VIDEO : बोगस शालार्थ आयडी प्रकरण; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उचलला 2020 मधील ‘तो’ मुद्दा, एसआयटी चौकशीची केली मागणी, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: mahavitaranmarathi newsmodel solar village competitionsolar pannelsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

July 28, 2026
‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

July 27, 2026
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 26, 2026
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page