• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 20, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

मुंबई, 20 जुलै : शासन निधी देवून नवनवीन लोकाभिमुख उपक्रम राबविते. इस्कॉनसारख्या मूल्याधारित संस्थांनी शासनासोबत भागीदारी केल्यास शासनाचे कौशल्य विकास उपक्रम फक्त तांत्रिक शिक्षणापुरते न राहता, व्यक्तिमत्व घडविणारे आणि समाजाभिमुख बनतील. हे सक्षम आणि सजग नागरिक घडवण्यासाठी फार उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपालांनी दिली इस्कॉन मंदिराला भेट –

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज गिरगाव चौपाटी (मुंबई) येथील इस्कॉन मंदिराला भेट दिली. शिवाय गोविंद सात्विक उपाहारगृहाचे उद्घाटन केले. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष गौरांग दास, राष्ट्रीय शेअर बाजारचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. रामामूर्ती, गोवर्धन इकोव्हिलेजचे सल्लागार रामा सिंग दुर्गवंशी, प्रकल्प प्रमुख नवलजीत कपूर, जननिवास प्रभू यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.

आध्यात्मिक शांतता व समाधानाचा अनुभव मिळाला –

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात पाऊल ठेवताच एक विशेष आध्यात्मिक शांतता व समाधानाचा अनुभव मिळाला. मी सन 2000 मध्ये इस्कॉन आणि गौरांग दास यांच्या सानिध्यात आल्यापासून शाकाहारी झालो. आपल्या देशातील संस्कृती आणि धार्मिकता इतर कोणत्याच देशात नाही. भारत नेहमी संरक्षणात्मक, शांततेच्या मार्गाचा अवलंब करीत आहे.


राज्यपालांकडून इस्कॉन संस्थेच्या जागतिक पातळीवरील कार्याचा गौरव –

यावेळी राज्यपालांनी आपल्या भाषणात इस्कॉन संस्थेच्या जागतिक पातळीवरील कार्याचा गौरव केला. इस्कॉनची जगभरात 1300 मंदिरे, 110 उपाहारगृहे आणि 65 शेती समुदाय आहेत. आजपर्यंत त्यांनी 3.8 अब्जांहून अधिक मोफत अन्नदानाचे कार्य केले असून, ‘फूड फॉर लाईफ’ ही जगातील सर्वात मोठी अन्नदान योजना ठरली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या ‘मिड डे मील’ योजनेतून चार दशलक्षहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना सकस अन्न दिले जाते.

या कार्याबाबत राज्यपालांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या सात्विक अन्नविषयक प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी ‘ईट राईट इंडिया’, ‘पोषण अभियान’ आणि ‘श्री अन्न’ अर्थात मिलेट्सच्या जागतिक स्वीकाराचा विशेष उल्लेख केला. यावेळी राज्यपालांनी नूतन ‘गोविंदाज’ या नवीन सात्विक उपाहारगृहाला भेट देवून सात्विक अन्नाचा वापर करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

इस्कॉन मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ती धर्माची आधारशिला आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले. यावेळी गौरांग दास यांनी राज्यपालांना इस्कॉनच्या कौशल्य विकास उपक्रमांबद्दल माहिती दिली, यावेळी गोवर्धन राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) सात्विक पाककला संस्थेचीही माहिती दिली.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील तीन आमदार हे पीआय बबन आव्हाड यांच्या निलंबनासाठी विधानसभेत एवढे आक्रमक का झाले? वाचा, A to Z  स्पेशल रिपोर्ट

बातमी शेअर करा !
Share
Tags: governor c p radhakrishnaniscon templemarathi newsmumbai

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | “मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो त्यावेळी…” जंगली रमीच्या व्हायरल व्हिडिओवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया

Video | “मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो त्यावेळी…” जंगली रमीच्या व्हायरल व्हिडिओवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया

July 20, 2025
Pachora News : दिलीप वाघ यांच्या निशाण्यावर ‘पाचोरा पोलीस’, अवैध धंद्यांविरोधात केला मोठा आरोप

Pachora News : दिलीप वाघ यांच्या निशाण्यावर ‘पाचोरा पोलीस’, अवैध धंद्यांविरोधात केला मोठा आरोप

July 20, 2025
शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

July 20, 2025
जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील तीन आमदार हे पीआय बबन आव्हाड यांच्या निलंबनासाठी विधानसभेत एवढे आक्रमक का झाले? वाचा, A to Z  स्पेशल रिपोर्ट

जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील तीन आमदार हे पीआय बबन आव्हाड यांच्या निलंबनासाठी विधानसभेत एवढे आक्रमक का झाले? वाचा, A to Z  स्पेशल रिपोर्ट

July 19, 2025
Chief Minister's Relief Cell provided support; 9 crore 62 lakhs assistance to the needy in the last six months

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

July 19, 2025
राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 19, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page