• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 11, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

मुंबई, 10 मार्च: नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने सर्व सुविधा नियोजनबद्ध, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, भूमी अभिलेख उपसंचालक, निफाड व नाशिकचे उपविभागीय दंडाधिकारी, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे भव्य प्रतीक आहे. देशभरातून तसेच जगभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना उत्तम सुविधा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. यावेळी नाशिक चक्राकार रस्ता, त्र्यंबक डीपी रोड, त्र्यंबक दर्शन पथ, द्वारका सर्कल परिसराचा विकास, ओझर विमानतळाशी संबंधित सुविधा, घोटीवाले रोड, कर्मचारी वसाहत, घाट बांधकाम तसेच विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन, जमीन मोजणी आदी कामांचा सविस्तर आढावा मंत्री महाजन यांनी घेतला.

कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था आणि सुरक्षितता यांचा विचार करून सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी करावी. कामे वेळेत पूर्ण होणे जितके आवश्यक आहे, तितकेच ती दर्जेदार आणि टिकाऊ असणेही महत्त्वाचे आहे.

कुंभमेळ्याच्या भव्यदिव्य आयोजनासाठी सर्व विभागानी आपआपसात समन्वय ठेवून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.

हेही वाचा : VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: kumbh melakumbh mela 2027minister girish mahajansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page