• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दोषी असल्यास राजीनामा देईन, ऑनलाईन रमीप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 22, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
I will resign if found guilty, Agriculture Minister Kokate clarified his position in a press conference

दोषी असल्यास राजीनामा देईन, ऑनलाईन रमीप्रकरणी कृषीमंत्री कोकाटेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका

नाशिक : महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चांगल्याच अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात मोबाईलमध्ये रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली असून आता ऑनलाइन पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होणार का? असा प्रश्नही विचारला जात आहे.

मला रमी खेळताच येत नाही –

पत्रकार परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, ऑनलाइन रमीसाठी त्याला बँकेचे खाते जोडावे लागते. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा. ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही. मला रमी खेळताच येत नाही, असे स्पष्टीकरण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.

माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. माझी राज्यात बदनामी झाली आहे. ज्या राजकीय नेत्यांनी ऑनलाईन रमीचा आरोप केला आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला.

दोषी असल्यास राजीनामा देईन –

तसेच ते म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना मी लेखी पत्र देणार आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून माझ्या पत्राच्या आधारे तुम्ही चौकशी करावी. इतकेच नव्हे तर मी ऑनलाईन रमी खेळत असेन, मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावं. त्या क्षणी न थांबता मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना न भेटता राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन, अशी भूमिका मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मांडली.

पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही –

मी त्यादिवशी सभागृहात होतो. ओएसडींना सभागृहात येत नाही. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो.त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला. त्या गेमचा सारखा पॉप-अप येतो. तो मला स्कीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. पण मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही. तो तुम्ही दाखवलाच नाही. मोबाईलवर एकच गेम येत नाही, वेगवेगळे गेम येतात. 30 सेकंद गेम स्कीप करता येत नाही. माझा व्हिडिओ 11 सेकंदांचा आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते, असेही मंत्री कोकाटे यावेळी म्हणाले.

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: Manikrao KokateManikrao Kokate newsnashikpress conference

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: एनसीएमसी कार्डसाठी पाचोरा आगाराची विशेष मोहीम; तीन गावांत शिबिरांचे आयोजन

Pachora News: एनसीएमसी कार्डसाठी पाचोरा आगाराची विशेष मोहीम; तीन गावांत शिबिरांचे आयोजन

November 28, 2026
“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

“संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची”, पाचोऱ्यातील ‘संविधान सन्मान जागर संवाद’मध्ये निखिल रांजणकर यांचे प्रतिपादन

November 27, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत, बीव्हीजी, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज

November 27, 2026
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील 33 जिल्ह्यांत पुढील 3 महिने मिळणार मोफत धान्य

November 26, 2026
पाचोरा नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर; नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी

पाचोरा नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर; नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी

November 26, 2026
जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; शासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; शासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

November 26, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page