• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या काय, प्रांजल खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचे आरोपी करण्याचं कारण काय?; एकनाथ खडसेंचे पोलिसांना ‘हे’ सवाल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 29, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
What is the definition of rave party, what is reason for making Pranjal Khewalkar number one accused?; Eknath Khadse's question to the police

रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या काय, प्रांजल खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचे आरोपी करण्याचं कारण काय?; एकनाथ खडसेंचे पोलिसांना 'हे' सवाल

पुणे, 29 जुलै : पुण्यात 27 जुलै रोजी एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. दरम्यान, सदर प्रकरणी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आता एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत पोलिसांना काही सवालही केले आहेत.

आज पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे म्हणाले की, 7 जणांची मिळून आदळआपट नसताना, कुठलंही संगीत नसताना, गोंधळ, नृत्य नाही. एका घरात ते 7 जण बसले आहेत. त्यांची पार्टी चालू होती, असं असताना तुम्ही याला रेव्ह पार्टी कसं म्हणू शकता, रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या तरी काय, असा सवाल एकनाथ खडसे यांनी पोलिसांना केला. तसेच याला जर रेव्ह पार्टी म्हणता येत असेल तर पुण्यातच नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रात, देशात प्रत्येक घरात जर असे 5-6 जण बसले तर त्याला रेव्ह पार्टीच म्हणावं लागेल, या शब्दात एकनाथ खडसे यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे रेव्ह पार्टीची व्याख्या तरी काय आणि रेव्ह पार्टी सांगून बदनाम करण्याचं प्रयोजन तरी काय, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.

पोलिसांनी याठिकाणी केलेल्या कारवाईचे व्हिज्युअल्स मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आले. पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की, खासगी आयुष्यातील असे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावेत असा सवाल करत पोलिसांनी निव्वळ बदनामीसाठी केलेले हे कृत्य आहे, असा आरोपही त्यांनी केला. पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा, त्यातल्या त्यात महिलांचे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही.

डॉ. प्रांजल खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचे आरोपी करण्याचं कारण काय. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्यांच्यावर गुन्हा असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. त्यांच्यावर आतापर्यंत एकही गुन्हा नाही. ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहे.

पोलीस म्हणाले, त्याठिकाणी 2.7 एमएल अंमली पदार्थ सापडले. हा साठा एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला, हे चित्रिकरणात दिसलं. पण त्या मुलीला याबाबत काही माहिती नाही, असं ती म्हणाली. पण प्रत्यक्षात ज्याच्याकडे पर्समध्ये अंमली पदार्थ सापडला, तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला हवा होता आणि इतरांना साक्षीदार करायला हवे होते. मात्र, हे सर्व एकनाथ खडसेंच्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी करण्यात आलेले कृत्य आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.

तसेच आरोपींच्या वैद्यकीय चाचणीत अल्कोहोल असल्याचा अहवाल माध्यमांकडे कसा आला आणि अद्याप अंमली पदार्थांचा अहवाल का समोर आला नाही असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे अंमली पदार्थांच्या अहवाला संदर्भात छेडछाड केली जात असावी, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: crimedrugeknath khadseeknath khadse pcmaharashtra politicspolicepranjal khewalkarpunepune policerohini khadse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page