• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता उद्या 2 ऑगस्ट रोजी होणार वितरित; जळगावात ‘पी.एम. किसान उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 1, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता उद्या 2 ऑगस्ट रोजी होणार वितरित; जळगावात ‘पी.एम. किसान उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव, 1 ऑगस्ट : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील बनोली, जि. वाराणसी येथून वितरीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने दिनांक २ ऑगस्ट २०२५ हा दिवस ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ म्हणून देशभर साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शेतकरी बांधवांमध्ये योजनेच्या पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रांची माहिती पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमे तसेच इतर माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC) उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन –

या दिवसाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री (पाणीपुरवठा) हे भूषविणार असून कार्यक्रमाला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन भारत सरकारच्या केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन –

या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेविषयी माहितीपर सादरीकरण, शेतकऱ्यांचे सुसंवाद व मार्गदर्शन सत्र, शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा व उपाययोजना यांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची माहिती देणे, तसेच योजना पारदर्शक व प्रभावीपणे लागू होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : महसूल दिन 2025 : जळगाव जिल्ह्यात 73 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: collector office jalgaonjalgaon newspm kisan utsav programpm kisan utsav program jalgaonsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page