• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यात महाराष्ट्र पोलीस दलात होणार 15 हजार मेगाभरती! मंत्री गिरीश महाजन यांनी दिली महत्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 12, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
राज्यात महाराष्ट्र पोलीस दलात होणार 15 हजार मेगाभरती! मंत्री गिरीश महाजन यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. दरम्यान, यावर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुंबईत माध्यमांसोबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पोलीस दलात मनुष्यबळ कमी आहे. दिवसेंदिवस आता परिस्थिती बदलत आहे. यामुळे पोलीस भरती होण्याबाबतचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत आणि त्यांनी आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत 15 हजार पोलीस पदभरती करण्याबाबतचा निर्णय घेतला असून युवकांना चांगल्या रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस शिपाई तसेच वाहनचालक आदी पदांची भरती केली जाणार आहे. यामुळे निश्चितच राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी याची त्याला मदत होईल, असेही मंत्री महाजन म्हणाले.

पोलीस भरती 2025 साठी किती पदे? –

राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी,  पोलीस शिपाई – 10 हजार 908, पोलीस शिपाई चालक – 234, बॅण्डस् मॅन – 25, सशस्त्री पोलीस शिपाई – 2 हजार 393, कारागृह शिपाई – 554. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.

लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर –

भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajanpolice bhartipolice recruitmentsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page