चोपडा, 22 सप्टेंबर : चोपड्यात फार्मसी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी “फार्मसी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर राष्ट्रीय परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली. ही राष्ट्रीय परिषद शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय चोपडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय चोपडा व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या सयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील परिषदेस प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण अभियान (PM-USHA) शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने अनुदान प्राप्त झाले आहे.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी म.गा.शि.मंडळा संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील होते. या परिषदेचे उद्घाटनप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सांगितले की, “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने औषधनिर्मिती, रुग्णनिदान, वैद्यकीय डेटा विश्लेषण आणि वैयक्तिक उपचारपद्धतीत क्रांतिकारी बदल घडत आहेत. हे तंत्रज्ञान फार्मसी क्षेत्राच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.”
दरम्यान, या परिषदेत देशभरातील नामवंत वैज्ञानिक, संशोधक, प्राध्यापक व फार्मसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील, प्रा. डॉ. बालकृष्ण बाहेती, प्रा. डॉ. प्रशांत अरगडे, प्रा. डॉ. ए. व्ही. पाटील, प्रा. नितीन पाटील व मिलिंद पाटील होते.
पहिल्या सत्रात प्रा. डॉ. प्रशांत अरगडे यांनी औषधनिर्मितीत एआयचे योगदान, वैद्यकीय डेटाचे विश्लेषण व त्या सोबत शिक्षकानी कुत्रीम बुद्धिमत्ता विषय आत्मसात करण्याचे भविष्यात किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व विषद केले. द्वितीय सत्रात प्रा. मिलिंद पाटील यांनी क्लिनिकल ट्रायल्समध्ये एआयचा वापर ,रुग्णाच्या प्रकृतीनुसार औषधनिर्धारण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. गौतम प्र. वडनेरे यांनी परिषदेचे महत्त्व विषद करून या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना एआय सारख्या प्रगततंत्रज्ञानाचा फार्मसी क्षेत्रात वापर कसा करता येईल, याची माहिती दिली.
प्रास्तविक परिषदेचे कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. संदीप आर. पवार यांनी केले. आलेल्या दोन्ही प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. तन्वीर शेख व प्रा. डॉ. किरण बाविस्कर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ.नलिनी मोरे यांनी केले. उदघाटन समारंभाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रुपाली पाटील यांनी केले तर परिषदेच्या समारोपाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. भरत जैन यांनी केले. सदरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कबचो उमवि चे PM USHA या कार्यक्रमाच्या प्रा डॉ एस आर कोल्हे व प्रा आशुतोष पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजना साठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मो रागीब , प्रा. डॉ. के. सी. पाटील, प्रा. डॉ. स्वर्णलता महाजन, प्रबंधक प्रफुल्ल मोरे सर डिप्लोमा विभाग प्रमुख प्रा. पियुष चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींचे सहकार्य व मोलाचे योगदान लाभले.






