• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 26, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 26 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मंजूर असलेली महावितरण कंपनीची विविध योजनांची प्रलंबित कामे कालबद्ध कार्यक्रम तयार करून तात्काळ पूर्ण करावीत,असे निर्देश, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील, जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महावितरण कंपनी, कृषी विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मंजूर कामांना महावितरण कडून गती मिळणे आवश्यक असून यासाठी संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, अतिवृष्टीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार असून,सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट  मदत केली जाणार आहे.


पीएम किसान योजनेची प्रकरणे निकाली काढून,सौर ऊर्जा प्रकल्प, पीएम-कुसुम व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, गतीने राबवून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, नादुरुस्त रोहित्रे व विजेच्या खांबांची दुरुस्ती करून वीजपुरवठा नियमित करावा, असे निर्देश त्यांनी दिले. स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करून पारदर्शक बिलिंग व विजेची बचत याबाबत माहिती गावागावांत पोहोचवावी, असेही ते म्हणाले.

ग्रामीण भागात वायरमन गावात वास्तव्यास नसल्याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत असून त्याबाबत  कठोर भूमिका घेऊन संबंधितांना नोटीस देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच तारांची चोरी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील व आमदार अमोल पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्या व अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. त्यावर महावितरणकडून सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, प्रत्येक तालुक्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामे पूर्ण करावीत, जल जीवन मिशन साठी वीजपुरवठा सुरू ठेवावा. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी यांनी यावेळी  महावितरण व कृषी  विभागाच्या सध्या स्थितीत सुरू असलेल्या कामकाजा संदर्भात सादरीकरण केले.

या बैठकीत  सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 अंतर्गत  चोपडा येथील  “पर्यावरणपूरक मानाचा गणपती”  या मंडळाने प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते चोपडा नगरपरिषदेचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी विभागाच्या ‘महाविस्तार – शेतकऱ्याचा डिजिटल मित्र’ या AI ॲपचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन

बातमी शेअर करा !
Share
Tags: agriculture departmentjalgaon newsmahavitaranminister gulabrao patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 17, 2026
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page