चोपडा, 30 सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शताब्दी वर्ष पूर्ण होत असून, या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संघाचा एक प्रमुख उत्सव असलेला विजयादशमी उत्सव चोपडा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उद्या गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:45 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
प्रमुख पाहुणे व वक्ते –
या उत्सवाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. वैशाली मंगेश वैद्य (एम.डी., आयुर्वेद) उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून चंद्रशेखर नवनाथ पाटील (जळगाव विभाग सहकार्यवाह) मार्गदर्शन करणार आहेत.
शताब्दी वर्षाचे औचित्य –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा 100 वर्ष पूर्ण होत असल्याने, वर्षभर संघ स्वयंसेवकांकडून विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्या निमित्ताने विजयादशमी उत्सवाला यंदा विशेष महत्त्व लाभले आहे.
नागरिकांना उपस्थितीचे आवाहन –
संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी विजयादशमी हा एक महत्त्वाचा उत्सव मानला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चोपड्यातील उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार आहे. आयोजकांनी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






