• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025; जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 9, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025; जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

जळगाव, 9 नोव्हेंबर : जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 पारदर्शक, शांत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व तयारी तत्परतेने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आढावा बैठकीत रोहन घुगे बोलत होते. या बैठकीला,जिल्हा पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी उपजिल्हाधिकारी, विजयकुमार ढगे,सहआयुक्त नगरपरिषद जनार्दन पवार, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2025 बाबत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. 4 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 4 वाजल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी 10 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. अंतिम उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. मतदान 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल, तर मतमोजणी व निकाल जाहीर 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल.

जिल्हाधिकारी,यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पाडली पाहिजे. याकरिता पोलीस विभागाला कायदा-सुव्यवस्थेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. संवेदनशील भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था, गुन्हेगारांवर कारवाई, तसेच मद्य व पैशांच्या वितरणावर कठोर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. गुंडगिरी, धमकावणे, आर्थिक शक्तीचा गैरवापर तसेच मद्य, पैसा किंवा अन्य वस्तूंचे वितरण रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.


तसेच फरार, सराईत गुन्हेगार व जामीनावर किंवा पॅरोलवर सुटलेले आरोपी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले. आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी भरारी पथक (Flying Squad), चेक पोस्टसाठी पथक (SST) व व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम (VST) या पथकांना सक्रिय ठेवण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

“एकल खिडकी प्रणाली” (Single Window System) सुरू करून निवडणुकीशी संबंधित परवानगी जलद आणि पारदर्शकपणे देण्याचे निर्देश देण्यात आले. उपविभागीय अधिकाऱ्यांना तडीपारी प्रकरणांचा निपटारा तत्काळ करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मतदान केंद्रांवरील तयारीबाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर वीज, पाणी, शौचालय आणि दिव्यांगांसाठी रॅम्प यांसारख्या मूलभूत सुविधा असाव्यात. या सुविधा नसलेल्या केंद्रांवर तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. मतदान व मतमोजणी अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचे दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. प्रशिक्षणात EVM हाताळणी, मॉक पोल, आणि मतमोजणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले जाणार आहे.

बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निर्देश दिले की, सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून वेळेत सर्व तयारी पूर्ण करावी आणि निवडणूक प्रक्रिया शांत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात यशस्वीरीत्या पार पाडावी.

हेही वाचा : Video | ‘जय श्रीराम’चा उल्लेख; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद साधताना सांगितले श्रद्धेचं महत्व

बातमी शेअर करा !
Share
Tags: electionjalgaon dm rohan ghugejalgaon newsmarathi newsmunicipal council general election 2025suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page