• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

भडगाव तालुक्यातील त्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची आरोपीची कबुली, प्रकरण उघड होऊ नये म्हणून…

नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या असून पुढील तपासासाठी भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 3, 2023
in भडगाव, क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा
भडगाव तालुक्यातील त्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची आरोपीची कबुली, प्रकरण उघड होऊ नये म्हणून…

आरोपी तरूण

जळगाव, 3 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील एका बालिका बेपत्ता झाली होती. यानंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह आढळून आला होता. तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून झाल्याचे म्हटले जात होते. आता याप्रकरणातील संशयित आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच संतापाची लाट उसळली आहे.

भडगाव तालुक्यातील संतापजनक घटना –
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील एका 7 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह मिळून आला होता. यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणातील तपासात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश मिळाले आहे. या प्रकरणी मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार गावातच राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाने केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या असून पुढील तपासासाठी भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील 7 वर्षीय मुलगी रविवारी 30 रोजी सायंकाळी घरी मिळून आली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी तिच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. यानंतर दोन दिवसांनी म्हणजे मंगळवारी 1 ऑगस्टला कुजलेल्या अवस्थेत या चिमुकलीचा मृतदेह त्यांच्या घराजवळील शेतकऱ्यांच्या कडबा कुट्टीत मिळून आला होता. यानंतर गावातील महिला तसेच नातेवाईकांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.

आरोपीने केला गुन्हा कबूल –

दरम्यान, याप्रकरणी गावातीलच तरुण स्वप्नील विनोद पाटील याच्यावर पोलिसांना संशय आला होता. तसेच ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला ती कुट्टी गोठ्यात होती. हा गोठा स्वप्नील पाटील याचा होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांना संशय बळावल्याने त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी अधिक सखोलपणे चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला.

चिमुकलीची निघृण हत्या –

दिनांक 30 जुलै रोजी आरोपी तरुणाने सदर मुलीला आमिष दाखवून संशयिताने त्याच्या गोठ्यात तिला बोलाविले. नंतर नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह त्याने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला होता. दरम्यान दोन दिवसांनी ग्रामस्थांना उग्र वास आल्याने प्रकरण उघड झाले. याप्रकरणी एलसीबीने संशयित आरोपी स्वप्नील विनोद पाटील याला अटक केली असून त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon crime newscrimecrime news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

June 5, 2026
उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

June 5, 2026
भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 2 लाख रुपयांहून अधिकचा साठा जप्त

भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 2 लाख रुपयांहून अधिकचा साठा जप्त

June 5, 2026
Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

June 4, 2026
विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत; उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट

विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत; उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट

June 4, 2026
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव

June 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page